🌟पुर्णा शहरातील आनंद नगर परिसरात शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत घर जळून खाक....!


🌟आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य फर्निचरसह लाखो रुपयांचे नुकसान🌟

पुर्णा : पुर्णा शहरातील आनंद नगर भागात आज शुक्रवार दि.२० ऑक्टोंबर २०२३ दुपारी ०१-०० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्यासह अन्य फर्निचरचे अतोनात असे नुकसान झाले असले तरीही अग्निशामक दलाच्या पथकाने तात्काळ घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

     आनंद नगर येथील मध्यवस्तीतील एका घरात दुपारी ०१-०० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्यामुळे आगीचा भडका उडाला. आगीने घराला चोहोबाजूंनी घेरले. त्यावेळी प्रत्यक्षदर्शनींनी तात्काळ अग्निशामक दलास माहिती दिली. अग्निशामक दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेवून घरातील सिलेंडर बाजूला काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला परंतु, घरमालक बंडू पारवे यांचे घरात गृहउपयोगी साहित्य पूर्णतः जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या