🌟पुर्णा पोलीस प्रशासनाकडून आयोजित शांतता समितीची बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात संपन्न....!


🌟आमचं कर्तव्य म्हणून आम्ही चोवीस तास सतर्क राहून सेवा बजावतो - उविभागीय अधिकारी गावडे


पुर्णा (दि.२१ ऑक्टोंबर) - पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांनी आज शनिवार दि.२१ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास शहरातील नगर परिषद प्रशासकीय इमारतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हदेव गावडे यांच्या अध्यक्षतेखाली दुर्गादेवी महोत्सव,रावणदहन,बौद्ध धर्मियांचा धम्मचक्र परिवर्तन दिन, लिंगायत समाजाचे गुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचा पालखी सोहळा या विविध धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित केली होती.


या बैठकीत पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा जेष्ठ नेते उत्तमराव कदम, जेष्ठ रिपाइं नेते तथा माजी उपनगराध्यक्ष प्रकाश कांबळे,जाकीर मौलाना, माझ्यामते एमआयएम नेते शफीक साहब,शांतता समितीचे सदस्य व नवरात्र महोत्सव मंडळाचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी तसेच पत्रकार,पुर्णा पोलीस स्थानकातील सर्व अधिकारी कर्मचारी आदींसह असंख्य लोक उपस्थित होते यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेले उपविभागीय अधिकारी ब्रह्मदेव गावडे हे उपस्थितांशी संवाद साधतांना म्हणाले की मी स्वतःला पुर्णेकर समजतो आम्ही पोलीस अधिकारी/कर्मचारी जरी असलो तरी आम्ही तुमच्या सेवेसाठी आलो आहोत त्यामुळे कायदा व सुव्यवस्था कायम राखणे आपल्या सर्वांचे कर्तव्य असते शांतता समितीच्या बैठकीला तुम्ही वेळेत वेळ काढून येतात वेळ खुप महत्वाचा आहे त्यामुळे खरोखरच तुमचे कौतुक करावे वाटते आपणा सर्वांचे एकत्रित येणे फार गरजेचे आहे आमचं कर्तव्य म्हणून आम्ही चोवीस तास सतर्क राहून सेवा बजावतो आपणाला प्रत्येक सन सामाजिक बांधिलकी जोपासत एकत्रित येऊन साजरे करायचे आहेत त्यामुळे जवाबदार नागरिक म्हणून आपण विशेष खबरदारी म्हणून सोशल मिडियावर  कुणाचीही भावना दुखावणारे मेसेज टाकणाऱ्या किंवा फारवड करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवावे असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले.


यावेळी पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांनी बैठकीत उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या