🌟पत्रकारितेतील तेजस्वी तारा आदरणीय दिनेश चौधरी.....!


🌟 त्यांनी समाजामधील अनिती अत्याचार भ्रष्टचार असेल या विरोधात परिणामाची तमा न बाळगता प्रखरपणे आपली लेखणी चालवली🌟

लेखक :- श्रीकांत हिवाळे सर

आपल्या निर्भीड निरपेक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून स्वतःच्या नावाची वेगळी ओळख निर्माण करणारे दिनेश चौधरी यांचं पत्रकारितेतील योगदान काळाच्या कसोटीला उतरलेले आहे.

मिडीयाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटल्या जात भारतीय वृत्तपत्र सृष्टीचा इतिहास देयदीप मान असा राहिला आहे.बाळशास्त्री जांभेकर लोकमान्य टिळक डॉ.बाबासाहेब आंबेडकर आचार्य प्र. के.अत्रे यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये सत्ताधारी पक्ष असेल इंग्रज शासन असेल समाजामधील अनिती अत्याचार भ्रष्टचार असेल या विरोधात परिणामाची तमा न बाळगता प्रखरपणे आपली लेखणी चालवली.

खऱ्या अर्थाने हे सर्व पत्र महर्षी पत्रकारितेतील दीप स्तंभ आहेत.यांच्या विचाराचा कार्याचा समृद्ध वारसा अजित न्यूज मुख्य संपादक आदरणीय दिनेश चौधरी हे चालवत आहेत.समाजातील शोषित पीडित वंचित गरीब अन्याग्रस्थ माणसाला न्याय देण्याचा काम त्यांच्या माध्यमातून होत असते. समाजाला दूषित करणारे घटक अवैध्य धंदे लाचखोर प्रवृत्ती याविषयी ते परखडपणे लिहीत असतात याविषयी ते परखडपणे लिहीत असतात.

समाजामधील सद्गुणी समाजहितासाठी झटणाऱ्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या निकोप समाज निर्मिती साठी योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आपल्या लेखणी मधून ते गौरव करतात.अशा या पत्रकारितेमधील तेजस्वी तारा आदरणीय दिनेश चौधरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंगल कामना...

पौर्णिमेच्या शितल अल्हाददायक चंद्रमा प्रमाणे आपलं आयुष्य प्रकाशमान होवो ही सदिच्छा...!

शुभेच्छुक

श्रीकांत हिवाळे सर

अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ता. पूर्णा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या