🌟सकल मराठा समाज बांधवांनी मशाल मोर्चाद्वारे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला🌟
परभणी/पुर्णा : पुर्णेतील सकल मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षणाच्या मागणीकरीता शुक्रवार दि.१३ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मशाल मोर्चाचे आयोजन केले होते यावेळी सकल मराठा समाज बांधव माता-भगिनींसह युवकांनी या भव्य अशा मशाल मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला.
या मोर्चात शालेय विद्यार्थ्यांसह विद्यार्थीनी, युवती, महिला तसेच युवकांसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होते. जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव या घोषणांनी संपूर्ण बाजारपेठ दणाणली. जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आता एकच मिशन मराठा आरक्षण, आरक्षक्षण कसं देत नाहीत, घेतल्याशिवाय राहणार नाहीत या घोषणांनीही सर्वसामान्य नागरीकांचे लक्ष वेधून घेतले.
दरम्यान, सकल मराठा समाज बांधवांनी या मशाल मोर्चाद्वारे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.....
0 टिप्पण्या