🌟गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केला मौजे.धारासूर येथे भक्तीमय महाअभिषेक...!


🌟यावेळी माजी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांची उपस्थिती🌟 


गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या शुभहस्ते आज मौजे.धारासूर येथील श्री.गुप्तेश्वर मूर्ती महाअभिषेक भक्तीभावाने करण्यात आला. 


गेल्या काही वर्षांपासून कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे प्रसिध्द श्री.गुप्तेश्वर मंदिराचा जीर्णोध्दार होत आहे. त्यामुळे महाअभिषेक करून मूर्ती तात्पुरती स्थलातंरीत करण्यात आली आहे. मंदिराचे पुरातन पावित्र्य जपून होणारा जीर्णोध्दार आध्यात्मिक लौकिकात भर घालणारा ठरेल, असा विश्वास असल्याची भावना विकासरत्न आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी व्यक्त केली. 


यावेळी माजी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कोल्हे, गटविकास अधिकारी श्री.मोडके, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, प्रल्हाद दादा कदम, दगडू दादा जाधव, सरपंच प्रतापराव कदम, उध्दव चोरघडे, राजेभाऊ कदम, अंगद जाधव, शिवाजी पवार, प्रभाकर जाधव, भारत जाधव, निवृत्ती जाधव यांच्यासह ग्रामस्थ महिला आणि पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या