🌟राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत परभणीला सुवर्णपदक...!


🌟पुणे विभागास ३-१ असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले🌟

परभणी (दि.३१ ऑक्टोबर) : क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत परभणी संघाने छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रतिनिधित्व करत मुंबई,नागपूर विभागावर मात केली. तर अंतिम फेरीत पुणे विभागास ३-१ असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले.   

या संघातील शिवनंदन मनोहर पुरी, तनिष्कराज संजय प्रधान, रुद्र माधव पाटील, श्रीपाद चिंतामणी कोठेकर, सोहम अशोकराव मोरे या खेळाडूस मार्गदर्शन डी. पी. पंडित, प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांचे लाभले. याप्रसंगी नांदेड जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेच्या निवडीसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, संजय मुंढे, शैलेंद्र सिंग गौतम, जिल्हा टेबल टेनिस सचिव गणेश माळवे, डॉ. विवेक नावंदर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.....

 *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या