🌟पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसा निमित्त शालेय साहित्य वाटप ; भाजपचे युवा नेते संदीप चौंडे यांचा उपक्रम....!


🌟कार्यक्रमासाठी भाजयुमो जिल्हाअध्यक्ष नीळकंठ चाटे यांची उपस्थिती🌟 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे भाजपचे युवा नेते संदीप चौंडे यांनी आयोजित केले होते.

       भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनखाली भाजपचे युवा नेते संदीप चौंडे यांच्या वतीने शनिवार दि.७ ऑक्टोबर २०२३ रोजी १२.१५ वाजता विद्यार्थिनींसाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी  भाजयुमो जिल्हाअध्यक्ष नीळकंठ चाटे, डॉ. यशवंत देशमुख,माजी नगरसेवक प्रा पवन मुंडे, महादेव इटके, संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, प्रा. प्रसाद देशमुख, इंडिया सिमेंटचे राजसिंह शेखावत, कुलदीप खोब्रागडे यांच्यासह प्राचार्या डॉ विद्या देशपांडे,  डॉ .विनोद जगतकर,  सोमनाथ कांदे, पत्रकार महादेव गित्ते आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपचे युवा नेते संदीप चौंडे हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात याबाबत सर्व स्तरातून कौतुक होत  आहे. प्रा डॉ दिग्रसकर यांनी आभार मानले. सुत्रसंचालन प्रा प्रविण फुटके यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाती शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या