🌟भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव फॅक्टरी येथील बुद्ध विहारात वर्षावास समापण समारोह व धम्म प्रवचन व संपन्न...!


🌟पुज्य भन्ते सुमंगल बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल चार महिने वर्षावास मासाचे आयोजन करण्यात आले होते🌟


जळगाव/भुसावळ (दि.०१ नोव्हेंबर) - जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव फॅक्टरी येथील सार्वजनिक बुद्ध विहारात आशाढ पौर्णिमा दि.०३ जुलै २०२३ ते अश्विन पौर्णिमा दि.२८ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत पुज्य भन्ते सुमंगल बोधी महाथेरो अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल चार महिने वर्षावास मासाचे आयोजन करण्यात आले होते.

या चार महिन्यांच्या कालावधीत सार्वजनिक बुद्ध विहारात वरणगाव फॅक्टरी मध्ये सार्वजनिक वर्षावास समितीच्या माध्यमातून पुज्य भन्ते सुमंगल बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सतत चार महिने दररोज धम्म ग्रंथाचं वाचन आणि प्रवचन करण्यात आले.वर्षावास समापण समारोह शनिवार दि.२८ ऑक्टोंबर २०२३ रोजी करण्यात आला यावेळी पुज्य भन्ते सुमंगल बोधी महाथेरो यांनी महापारित्राण पाठ आणि पुजा करतात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास हा घालून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले वरणगाव फॅक्टरीचे महाप्रबंधक आयुष्यमान अजयकुमार सिंह यांनी अध्यक्षीय भाषणात असे नमूद केले की आज खऱ्या अर्थाने जगाला तथागत भगवान बुध्दाच्या शिकवणीची गरज आहे आज जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती जर कमी करायची असेल तर बुध्दांच्या शिकवणीची नितांत गरज आहे मनुष्य कोणत्याही धर्माचा असों परंतु बुध्दांची शिकवन ही प्रत्येक मनुष्यासाठी आहे त्यामुळे प्रत्येक मानवाने जर बुध्दांनी सांगितलेल्या मार्गाचा उपयोग आपल्या जीवनात केला प्रत्येकाच्या जिवनाचे भले होईल असेही आयु.अजयकुमार सिंह म्हणाले.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आयु.विजय सिंह (डिआरडीओ वैज्ञानिक) तसेच त्यांच्या सौभाग्यवती आयु.उमा सिंह मॅडम (अध्यक्षा दिपशिखा ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव),आयु.पी.जी.बनसोड (सिएमओ ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल) आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमास वरणगाव आयुध निर्मानीतील अधिकारी/कर्मचारी, युनियन पदाधिकारी, क्रेडिट सोसायटी संचालक आणि इतर सर्व राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी वर्षावास समितीचे अध्यक्ष आयु.मा.चंद्रकांत गवळी, सचिन आयु.आर.जे.सुरवाडे, कोषाध्यक्ष आयु.जितेद्र केदारे, ऑडिटर आयु.संजय भालेराव,सल्लागार आयु.पि.जी.सोनवने आदींनी यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन आणि नियोजन केले.

यावेळी महिला अध्यक्ष शिलांबरी जमदाडे, उपाध्यक्ष उषाताई सोनवणे, कोषाध्यक्ष अंजुताई भालेराव यांनी सुद्धा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले तसेच मोहन इंगळे (जळगाव जिल्हाध्यक्ष बिबीएम),संजय मेंढे,विनोद शिरसाठ,जिवन आहीरे,कडू हाताळकर, सुरेश बत्तीसे,शेखर सुरवाडे,जे.डी.तायडे, ज्ञानेश्वर वानखेडे,सुरेश वानखेडे,अजय इंगळे,योगेश सपकाळे (जिल्हाध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती), पंकज हिरोळे सचिव,सुभाष संस्थाने,उमेश वाघ,गौतम सुरवाडे,आजबराव मोरे,मिनाक्षी लांडगे,जोत्सना तायडे,नलीनी डोंगरे,नलीनी सोनवणे,अरुणाताई इंगळे,कपीला गवळी (राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघ जळगाव), सुलोचना लोखंडे,मालती तायडे,पंडित तायडे,प्रशांत बावस्कर,सुनील गाढे यांच्यासह श्रावण धारा टेंड हाऊस,राधेश्याम विष्णू कॅटर्स यांचें देखील विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.सुधीर गुरचळ यांनी केले तर कार्यक्रमास उपस्थितांचे आभार आयु.चंद्रकांत गवळी यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या