🌟मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवार पासून फरकंडा येथील हनुमान चौकात साखळी उपोषण सुरू...!


🌟उपोषणाचा आज रविवार दि.२९ ऑक्टोंबर रोजी पाचवा दिवस आहे🌟


पालम : पालम तालुक्यातील सहा गावच्या ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवार पासून फरकंडा येथील हनुमान चौक येथे साखळी उपोषणास सुरुवात केली. त्यात फळा, फरकंडा, जवळा, आईनवाडी, डिग्रस आणि गुळखंड गावचा समावेश आहे


मराठा समाजास शैक्षणिक आरक्षणाची गरज आहे. त्याचा विचार करून समाजास तातडीनं आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. आहे त्याची निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने पालम तहसीलदारांना सादर करण्यात आले. त्यात सदर गावचे ग्रामस्थ साखळी पद्धतीने उपोषण चालू आहे....:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या