🌟नांदेड मधील विष्णुपूरीतील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील प्रकार गंभीर - स.मनबीरसिंघ ग्रंथी🌟पत्रकारांनी रुग्णालयाच्या संपूर्ण नावाचा उल्लेख करावा असेही स.मनबीरसिंघ ग्रंथी म्हणाले🌟

🌟श्री गुरुगोविंदसिंघजी यांचे नाव वगळून डॉ.शंकरराव चव्हाण यांचे नाव रुग्णालयाला देणे रुग्णालयाच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी ठरले घातक🌟


नांदेड मधील विष्णुपूरीतील डॉ.शंकरराव चव्हाण जिल्हा शासकीय रुग्णालयातील अकार्यक्षम व निश्क्रीय व्यवस्थेमुळे ३१ रुग्णांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूचा प्रकार निश्चितच अत्यंत गंभीर असून हा प्रकार रुग्णालयाच्या प्रशासकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे सदरील घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील स्थानिक वृत्तपत्रांसह आघाडीच्या राष्ट्रीय वृत्तपत्र तसेच वृत्तवाहिन्यांवर प्रकाशित होणाऱ्या बातम्यांचा आढावा घेतल्यास असे निदर्शनास येत आहे की या वृत्तपत्र प्रतिनिधींसह वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी देखील रुग्णालयाच्या नावाचा केवळ जिल्हा शासकीय रुग्णालय असाच उल्लेख करीत असून डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असा उल्लेख करणं जाणीवपूर्वक टाळल जात आहे सदरील जिल्हा शासकीय रुग्णालयाचे नाव पुर्वी श्री गुरू गोविंदसिंघजी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असे होते परंतु जाणीवपूर्वक काही राजकीय षडयंत्रकारी मंडळींनी द्वेषभावनेतून या जिल्हा शासकीय रुग्णालयाचे नाव बदलून गुरू गोविंदसिंघजी महाराज यांचा अवमान केला जेव्हा पासून या रुग्णालयाचे नाव बदलण्यात आले तेव्हापासून या रुग्णालयाच्या प्रशासकीय व्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम झाल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे पत्रकारांनी या जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण नावाचा उल्लेख करावा जिल्हा शासकीय रुग्णालयाला डॉ.शंकरराव चव्हाण यांचे नाव असल्याकारणाने काही पत्रकार या नावाचा उल्लेख करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे असा आरोप बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सरदार मनबीरसिंघ ग्रंथी यांनी केला असून दशमेशपिता श्री गुरू गोविंदसिंघजी यांचे नाव हटवून डॉ.शंकरराव चव्हाण यांचे नाव जिल्हा रुग्णालयाला देणे आत्मघातकी ठरलं असून रुग्णालयाच्या प्रशासकीय व्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम झाल्याचे जानवत आहे प्रथमतः २४ तासात २४ रुग्णांचा झालेला मृत्यू ज्यात १२ नवजात बालकांचा समावेश व त्यानंतर पुन्हा सात रुग्णांचा झालेला मृत्यू हा प्रशासकीय व्यवस्थेला काळीमा फासणारा असून या दुर्दैवी घटनेस रुग्णालय प्रशासनासह आरोग्य मंत्रालय देखील जवाबदारी असून शासनाने सदरील शासकीय जिल्हा रुग्णालयाचे नाव बदलण्याकारणाने या रुग्णालयातील प्रशासकीय व्यवस्थेसह रुग्णांच्या आरोग्यवस्थेवर देखील याचा परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे प्रशासनाने रुग्णालयाची व्यवस्था गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाकडे देऊन या रुग्णालयाचे पूर्वीचे नामांतर जैसे थे करून नांदेड जिल्हा शासकीय रुग्णालयाला श्री गुरुगोविंदसिंघजी यांचे नाव पूर्ववत देण्यात यावे अशी मागणी सुध्दा सरदार मनबीरसिंघ ग्रंथी यांनी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या