🌟परभणी जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.रामेश्वर आवरगंड यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा....!


🌟मराठा आरक्षणासह मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठींब्यासाठी दिला पदाचा राजीनामा🌟 

परभणी (दि.३० ऑक्टोंबर) - परभणी जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर महासंघाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर आवरगंड यांनी आज सोमवार दि.३० ऑक्टोंबर २०२३ रोजी मराठा आरक्षणा संदर्भात सरकार कडून होत असलेल्या विलंबाचा निषेध व क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला.

परभणी जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.रामेश्वर आवरगंड यांनी आपल्या पदाच्या दिलेल्या राजीनामा पत्रात असे नमूद केले की मी राष्ट्रवादी पदवीधर संघटना जिल्हा अध्यक्ष परभणी या पदावर कार्यरत असून माझ्या असे निदर्शनास येते की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारची भूमिका उदाशीन असल्याचे दिसून येत आहे व राज्य सरकारने घेतलेला ४० दिवसाचा वेळ पूर्ण होऊन देखील मराठा आरक्षणावर अद्याप कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. यासाठी माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मा.श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणास पाठींबा म्हणून मी माझ्या राजकीय पदाचा त्याग करत आहे.

माझा राजकीय पक्ष व माझे पद जर समाजाला न्याय देऊ शकत नसेल तर मला राजकीय पक्षात कार्य करण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. म्हणून पक्षापेक्षा माझा मराठा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि त्याचे देणे लागते करीता मी माझ्या राजकीय पक्षाच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या