🌟परभणी जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना दिवाळीपूर्वी पेन्शन,ग्रॅज्युटी द्या.....!


🌟जिल्हा प्रशासनास जिल्हा शाखेतर्फे निवेदन सादर🌟

परभणी (दि.17 ऑक्टोंबर) : सेवानिवृत्त शिक्षकांना दिवाळीपूर्वी पेन्शन, ग्रॅज्युटी आणि सातव्या वेतन आयोगाचे हप्ते देण्यात यावे अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी दि.17 ऑक्टोंबर जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.

          सन 2022-23  या वर्षात राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांना पेन्शन विक्री, ग्रॅज्युटी, सातवा वेतन आयोगाचे हप्ते मिळाले नाहीत. बावीस लाख कर्मचार्यांना या सर्व रकमा मिळतात. फक्त सात ते आठ हजार जिल्हा परिषद शिक्षकांवर अन्याय झाला आहे. यासाठी किमान दोन हजार कोटींची गरज आहे. दिवाळी आनंदाची होण्यासाठी जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षकांना दिवाळीपूर्वी पेन्शन विक्री, ग्रॅज्युटी, सातवा वेतन हप्ते देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

         निवेदनावर जिल्हाध्यक्ष एम. के. कादरी, जिल्हा कार्याध्यक्ष जी. व्ही. कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस पी.जी. शिसोदे, भारत डहाळे, परसराम पवार, शिवाजी बर्वे, नितीन बांडे, सय्यद मुसा काजी, प्रसाद मोरे, सय्यद मूनसब, शे़धख वहिदा बेगम आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या