🌟राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा परभणी जिल्हा दौरा....!


🌟गंगाखेड येथील क्रिकेट मैदान गोदावरी तांडा येथे आयोजित ऊसतोड कामगार महामेळावा महाराष्ट्र -२०२३ या कार्यक्रमास उपस्थिती🌟 

परभणी (दि.१५ ऑक्टोंबर) : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे उद्या सोमवार दि.१६ ऑक्टोंबर रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 

मृद व जलसंधारण मंत्री श्री. राठोड हे सोमवारी सकाळी ९:३० वाजता नांदेड येथून शासकीय वाहनाने गंगाखेड (जि. परभणी) कडे प्रयाण करतील. सकाळी १०:१५ वाजता गंगाखेड येथील संदीप राठोड यांच्या घरी धावती भेट देतील. त्यानंतर  गंगाखेड येथील क्रिकेट मैदान, गोदावरी तांडा येथे आयोजित ऊसतोड कामगार महामेळावा महाराष्ट्र -२०२३ या कार्यक्रमास उपस्थित राहून संबोधित करतील त्यानंतर दुपारी २ वाजता त्यांची वेळ राखीव राहील. जलसंधारण मंत्री संजय राठोड हे दुपारी ३ वाजता शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण करतील.....

*******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या