🌟परभणी जिल्हा शिवसेना (उबाठा) गटाचे उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले यांनी उपजिल्हा प्रमुख पदाचा दिला राजीनामा...!


🌟मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा समाजास ओबीसी तून आरक्षण देण्याच्या मागणी दिला राजीनामा🌟 


परभणी (दि.३० ऑक्टोंबर) - परभणी जिल्हा शिवसेना (उबाठा) गटाचे उपजिल्हा प्रमुख दशरथ निवृत्तीराव भोसले यांनी क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषण अर्थात अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा तसेच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आपल्या उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्याकडे आज सोमवार दि.३० ऑक्टोंबर २०२३ रोजी सुपूर्द केला आहे.

परभणी उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देतांना दशरथ भोसले यांनी राजीनामा पत्रात असे नमूद केले आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारची भूमिका उदासीन दिसून येत असून राज्य सरकारने घेतलेला ४० दिवसांचा वेळ पुर्ण होऊन देखील मराठा आरक्षणावर सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही यासाठी सरकारचा जाहीर निषेध करतो व मी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपल्या राजकीय पदाचा त्याग करीत असल्याचे देखील दशरथ भोसले यांनी राजीनामा पत्रात नमूद केले असून पुढे असेही नमूद केले आहे की माझा राजकीय पक्ष व माझे पद जर माझ्या समाजाला न्याय देऊ शकत नसेल तर मला राजकीय पक्षात कार्य करण्याचा नैतिक अधिकार राहात नाही.

करीता मी माझ्या पक्षाच्या पदाचा राजीनामा देत आहे तरी तो मान्य करावा असेही त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे... मराठा आरक्षण आंदोलनासह क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा म्हणून अनेक पदाधिकारी आप आपल्या राजकीय पक्ष पदांचा राजीनामा देत असल्याचे व काही देण्याच्या तयारीत असल्याचे निदर्शनास येत आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या