🌟पुर्णेचे उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मानंद गावंडे यांनी दिली बुद्धविहारास सदिच्छा भेट....!


🌟यावेळी त्यांनी तथागत भगवान बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले🌟

पुर्णा (दि.१५ ऑक्टोंबर) - पुर्णेचे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मानंद गावंडे यांनी आज रविवार दि.१५ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२-०० वाजता पुर्णा येथील बुद्ध विहारास सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी महामानव तथागत भगवान बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

विहार समितीच्या वतीने वा.रा. काळे गुरुजी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मानंद गावंडे व ईश्वर सुरवाडे रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल पूर्णा यांचे स्वागत केले.याप्रसंगी प्रमुख उपस्थिती भदंत पयावांश ज्येष्ठ धम्म उपासक टी.झेड.कांबळे अमृतराव मोरे पंडित डोंगरे शिवाजी थोरात गौतम वाघमारे श्रीकांत हिवाळे राम भालेराव गौतम भोळे  यांची उपस्थिती होती.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या