🌟वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कोल्ही बोर्डीत शिक्षकाला लोखंडी रॉडने मारहाण करून जिवंत जाळले....!

 


🌟या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ ऊडाली असुन पोलिसही आरोपिंचा कसुन शोध घेत आहेत🌟


फुलचंद भगत

वाशिम:-वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एका शिक्षकाला लोखंडी राॅडने मारहान करुन नंतर जिवंत जाळल्याची खबळजनक घटना घडली असुन पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

                   शाळेवर जात असताना एका शिक्षकाला अज्ञात आरोपींनी अडवून लोखंडी रॉडने जबर मारहाण करून जिवंत जाळण्यात आल्याची घटना आज मालेगाव तालुक्यातील कोल्ही बोर्डी रस्त्यावर घडली.या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ ऊडाली असुन पोलिसही आरोपिंचा कसुन शोध घेत आहेत.शाळेवर जात असताना एका शिक्षकाला अज्ञात आरोपींनी अडवून लोखंडी रॉडने जबर मारहाण करून जिवंत जाळण्यात आल्याची घटना मालेगाव तालुक्यातील कोल्ही बोर्डी रस्त्यावर घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर सुनील उर्फ दिलीप धोंडुजी सोनवणे शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी ते दुचाकीने शाळेत जात असताना कोल्ही बोर्डी रस्त्यावर अज्ञात आरोपींनी अडवून त्यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली व अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. त्यानंतर अज्ञात आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, बराच वेळ ते गंभीर अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून होते. त्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम येथे दाखल करण्यात आले. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेची माहिती मिळताच पोलीस, फॉरेन्सिक पथकाने प्रत्यक्ष स्थळी भेट दिली. सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून दोन पथकांचे गठण करण्यात आले आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे पोलिस विभागाकडुन सांगण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या