🌟पुर्णा तालुक्यातील माटेगावात मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना गावबंदी....!


🌟माटेगाव येथील सकल मराठा समाज बांधवांनी दिले तहसिलदार माधवराव बोथीकर यांना निवेदन🌟


पुर्णा (दि.२६ ऑक्टोंबर) - पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथील सकल मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षणाला सरकारकडून होत असलेला विलंब व सरकारचे वेळकाढूपणाचे धोरण या विरोधात संताप व्यक्त करीत आज गुरुवार दि.२६ ऑक्टोंबर २०२३ रोजी माटेगावात  राजकीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना गावत प्रवेश बंदी करण्यात आल्या संदर्भात तसेच मराठा आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे मागणीचे लेखी स्वरूपात पुर्णेचे तहसीलदार माधवराव बोथीकर यांना निवेदन दिले.

यावेळी समस्त सकल मराठा समाज बांधवांसह माटेगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या