🌟परभणी लोकसभा मतदारसंघात भाजपचाच खासदार निवडून आणणार....!


🌟भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा निर्धार🌟 

परभणी (दि.२४ ऑक्टोंबर) - परभणी लोकसभा मतदारसंघात या लोटसभा निवडणूकीच्या माध्यमातून निश्‍चितच परिवर्तन घडून येईल व भारतीय जनता पक्षाचाच खासदार परभणी लोकसभा मतदारसंघात निवडून येईल असा ठाम विश्‍वास भारतीय जनता पार्टीचे निरिक्षक तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

           जिंतुर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी जिंतूरात वतीने परभणी भाजपा लोकसभा निवडणुक प्रमुख माजी आमदार बोर्डीकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने नागरी सत्कारही आयोजित करण्यात आला. यावेळी सौ. मिनाताई बोर्डीकर, माजी नगराध्यक्ष वसंतराव शिंदे, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, विनोद राठोड, गंगाधरराव बोर्डीकर, पंडितराव दराडे, सचिन गोरे, डॉ. दैवतराव लाटे, गजानन जगाडे, पाडुरंगराव वाळवंटे, अविनाशराव वाघमारे, अनिरुद्ध काळे यांच्यासह जिंतुर तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या