🌟सरकारचा कंत्राटी नोकरभरती करण्याचा निर्णय : सुशिक्षीत तरुणांचे भविष्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न - खा. संजय जाधव

 


🌟खासदार संजय जाधव यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाला मंगळवार दि.१० ऑक्टोंबर रोजी घेराव घालण्याचा इशारा🌟 

परभणी : सरकाने ९ खाजगी एजन्सीच्या माध्यमातून कंत्राटी नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला. सरकारचा हा कुटील डाव असून सुशिक्षीत तरुणांचे भविष्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू केला आहे. या कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय  मागे घ्यावा या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला जाईल अशी माहिती खा.संजय जाधव यांनी दिली.

 ६ सप्टेंबर २०२३ रोजी यापुढील शासकीय कार्यालयातील रिक्त जागा भरण्यासाठी ९ खाजगी संस्थांची कंत्राटी नोकरभरतीसाठी नियुक्ती केली आहे. सदर एजन्सी पुढील पाच वर्षासाठी नियुक्त असणार असून राज्य शासनाचे शासकीय विभाग, निम शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व इतर आस्थापनामध्ये कंत्राटी नोकरभरती या एजन्सीमार्फत होणार आहे, सरकारचा हा निर्णय सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार तसेच आरक्षणाचा लाभ उठणाऱ्या समाजांना अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा या सरकारच्या विरोधात प्रखर आंदोलन उभारली जाईल असा इशारा खासदार जाधव यांनी दिला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या