🌟पुर्णा तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकांचे येलो मॅजिक रोगामुळे प्रचंड नुकसान.....!


🌟तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली तहसिलदार यांचेकडे मागणी🌟 


पुर्णा (दि.०९ ऑक्टोंबर) - पुर्णा तालुक्यात यावर्षीच्या हंगामात सततचा पावसाचा खंड पडल्यामुळे तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकांचे येलोमॅजिक रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांनाच्या हाती आलेले सोयाबीन पिक येलोमॅजिक रोगामुळे ७५ टक्के गेले असून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी खत बी-बियाणे किटकनाशके पेरणी नांगरणी असा प्रतिएकरी केलेला वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च अक्षरशः वाया गेला असून प्रति एकरी तीन ते चार कट्टे सोयाबीनचा उतारा येत आहे त्यामुळे महसूल प्रशासनाने पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर सातेगाव धनगर टाकळी सारंगी अजदापूर भाटेगाव या गावातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून सोयाबीन पिकासाठी हेक्टरी ४० हजार रुपये मदत जाहीर करावी तसेच पिक विमा पंचवीस टक्के ऐवजी १००% नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावा खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना अनुदानावर हरभरा ज्वारी बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी ही मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार माधवराव बोथीकर व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आज सोमवार दि.०९ ऑक्टोंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

तहसिलदार माधवराव बोथीकर व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर उद्धव बालासाहेब कदम,संजय गंगाधर कदम,नामदेव शिवाजी कदम,कालिदास साहेबराव कदम,ज्ञानोबा मारोतराव कदम,हरिभाऊ दत्तराव कदम,विठ्ठल काशिनाथ कदम,बालाजी मारोतराव कदम,उद्धव श्रीपतराव कदम,बालाजी दत्तराव कदम,पंडित गणपतराव कदम,आत्माराम कदम मोकिंद माधवराव कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या