🌟चिखलीचे ग्रामदैवत श्रीरेणुकादेवी मंदिरामध्ये रेणुकादेवी गरबा महोत्सव समितीतर्फे मान्यवरांचा सत्कार.....!



🌟श्री रेणुकामाता मंदिराच्या उपाध्यक्ष व विश्वस्तांसह प्रतिष्ठीत पत्रकार तसेच मान्यवरांचा सत्कार 🌟


चिखली : चिखलीचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री रेणुकादेवी मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षांप्रमाने याही वर्षी श्री रेणुका मातेच्या मंदिराच्या परिसरात गरबा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. यामध्ये अनेक महिलां व मुलींनी मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभाग घेतलेला आहे .


 
चिखलीच्या श्री रेणुकादेवी मंदिराच्या परिसरात श्री रेणुकादेवी गरबा महोत्सव समितीतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक गरबा खेळला जातो रात्री आठ वाजता गरबा खेळण्यास सुरुवात होते दहा वाजेपर्यंत भक्तीमय वातावरणात पारंपरिक गरबा खेळून महिषासुरमर्दिनी जगदंबा माता देवीची आराधना केली जाते.या वेळी पारंपरिक वेशभूषा करून सर्व महिला, मुली गरबा खेळतात.गरब्याला नृत्याप्रमाणे सादर केल्या जात असल्याने काही वेळा गरब्याच्या स्टेप्स बदलेल्या पहायला मिळतात.या वेळी गरबा खेळणाऱ्या महिला मुली तीन टाळ्या वाजवत गरबा खेळतात या तीन टाळ्या म्हणजे त्रिदेवाला नमन करणे होय. पहिली टाळी ब्रम्हदेवाला, दुसरी टाळी भगवान विष्णूला तर तिसरी टाळी महादेवाला असे सांगितले जाते. गरबा  नृत्यामुळे निर्माण होणाऱ्या आवाजामुळे आई जगदंबा माता जागृत होते असे म्हटले जाते.

गरबा उत्सवाच्या निमित्ताने श्री रेणुकामाता मंदिर परिसरात गरबा खेळणाऱ्या महिलांनी  पुढाकार घेऊन श्री रेणुकामाता मंदिराच्या उपाध्यक्ष व विश्वस्तांसह अनेक मान्यवरांचा सत्कार केला. याप्रसंगी श्री रेणुकामाता  संस्थांनचे उपाध्यक्ष गोपालभाऊ शेटे, विश्वस्त   सचिनभाऊ बोंद्रे, माजी नगराध्यक्ष   सुहासभाऊ शेटे, बुलढाणा जिल्हा परिषदचे डेप्युटी सीओ आशिषजी पवार , आर्य नंदी पतसंस्थेचे उपाध्यक्ष विजयभाऊ खरात , मराठी पत्रकार परिषदचे बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख  पत्रकार मोहन चौकेकर , मुख्याध्यापक  सुनील भवर , प्रतिष्ठित व्यावसायिक  मनोज चोपडा आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना श्री रेणुकामाता मंदिराचे उपाध्यक्ष गोपालभाऊ शेटे यांनी श्री रेणुकामाता मंदिराच्या धार्मिक व पवित्र अशा परिसरात सी सी टीव्ही लावलेल्या व महिलांच्या सुरक्षितेतीची काळजी घेणाऱ्या गरबा महोत्सवामध्ये अधिकाधिक महिलांनी व मुलींनी सहभागी होऊन या महिलांच्या सुरक्षेतेची काळजी घेणाऱ्या गरबा महोत्सचा आनंद घ्यावा असे आवाहन या वेळी केले. या गरबा महोत्सचामध्ये गरबा खेळणाऱ्या  महिलांचे नेतृत्व करणाऱ्या एडवोकेट  सौ छाया काचवाल या करत आहेत.या वेळी बोलताना एडवोकेट छाया काछवाल यांनी गरब्याच्या सरावासाठी प्रॅक्टिससाठी पंधरा दिवस पहिले वरचा हाॅल व महोत्सवामध्ये खालचा हाॅल उपलब्ध करून दिल्याबद्दल  तसेच गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या महिला व मुलींसाठी पाणी व फराळाची व्यवस्था केली व महिलांच्या व मुलींच्या सुरक्षितेतीची योग्य ती काळजी घेतली त्याबद्दल श्री रेणुका देवी मंदिराचे अध्यक्ष  राजाभाऊ खरात, उपाध्यक्ष गोपालभाऊ शेटे व सर्व विश्वस्तांचे आभार मानले.या गरब्यामध्ये पुजा भालेराव , स्वाती दानवे , रेणुका शर्मा, शुभश्री भालेराव , गायत्री खंडेलवाल ,  मीनाक्षी पांडे,  हर्षा खुणारे , वैष्णवी खंडेलवाल ,सायली फटिंग जयश्री मोरवाल ,  यांच्यासह अनेक महिला व मुलींना सहभागी घेतला आहे . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एडवोकेट छाया काछवाल यांनी केले....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या