🌟पुर्णा तालुक्यातील गौर गावात पुढाऱ्यांना यापुढे संपूर्णतः प्रवेश बंदीसह मतदानावर देखील बहिष्कार....!


🌟गौर ग्रामपंचायतीत ग्रामस्थांच्या साक्षीने ठराव करण्यात आला पास🌟

पुर्णा : पुर्णा तालुक्यातील गौर ग्रामपंचायत कडून विशेष ग्रामसभा घेऊन सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने बहुमताने ठराव पास करुन गावात राजकीय लोकप्रतिनिधी व पुढार्‍यांना प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला यावेळी ठरावाला सुचक म्हणून ग्रामपंचायत सदस्य नरेश जोगदंड व अनुमोदक म्हणून ग्रामपंचायत सदस्य गणेश भगवानराव जोगदंड हे होते हा ठराव ग्रामस्थांनी बहुमताने पारित केला.

ग्रामसभेचा ठराव व मतदानावर बहिष्कार व प्रवेश बंदीचे निवेदन माननीय तहसीलदार तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांना देण्यात आले या तासा मजकूर लिहिण्यात आला चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत गावात पुढार्‍यांना व राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. एवढं निवेदन देऊन बी गावात जर कोणी नेत्यांनी प्रवेश केल्यास तो नेता अपमानास पात्र असेल अशी स्पष्ट ताकीद यात देण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या