🌟पुर्णा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष शाहूराव भुसारे यांनी मराठा आरक्षणासाठी दिला आपल्या पदाचा राजीनामा...!


🌟पक्ष आणि पदापेक्षा माझा समाज माझ्यासाठी किती तरी मोठा आहे - शाहूराव भुसारे

पुर्णा (दि.२८ ऑक्टोंबर) - पुर्णा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा नावकी येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते शाहूराव भुसारे यांनी मराठा समाज आरक्षणाच्या समर्थनार्थ आज शनिवार दि.२८ ऑक्टोंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा  राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराव देसाई यांच्याकडे दिला आहे.

यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की माझा राजकीय पक्ष व माझे पद समाजाला न्याय देऊ शकत नसेल तर मला राजकीय पक्षात कार्य करण्याचा नैतिक अधिकार राहत नाही यासाठी पक्षापेक्षा माझा समाज मोठा आहे म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या