🌟अमरावती एक्सप्रेस ने मुंबई बडनेरा असा प्रवास करत असताना बेपत्ता झालेल्या तरुणीचा अवघ्या चार तासात लावला शोध.....!


🌟उप निरीक्षक विजय साळवे प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांच्या मेहनतीला यश🌟

अकोला/शेगाव : अमरावती एक्सप्रेस ने मुंबई बडनेरा असा प्रवास करत असताना दिनांक 26 ऑक्टोंबर 2023 रोजी एक तरुणी आपल्या सोबत असलेल्या बहिणीला व दाजी ला न सांगता शेगाव स्टेशनवर उतरली .जाग आल्यावर ती न दिसल्याने ते परत शेगाव ला आले व मिसिंग दाखल करून आरपीएफ शेगाव येथे आपली समस्या घेऊन गेले असता उप निरी विजय साळवे व प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रंजन तेलंग यांनी CCTV च्या आधारे तिचा शोध घेतला असता ती शेगाव येथे उतरल्याचे दिसून आले नंतर पूर्ण फुटेज पिंजून काढल्यावर ती गजानन महाराज मंदिराकडे जातांना दिसली त्यावरून रंजन तेलंग यांनी आपल्या गुप्तहेर ना याची सूचना दिली व अवघ्या चार तासात त्या 20 वर्षीय तरुणीला तिच्या नातेवाईकांना सुपूर्द केले. फ्लॅट च्या पैशाची व्यवस्था होत नसल्याने टेन्शन मध्ये ती ट्रेन मध्ये उतरून मंदिरात गेल्याचे त्या तरुणीने सांगितले.

रेल्वे सुरक्षा बलाच्या या कामगीरी ने जनतेत एक सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या