🌟परभणी तालुक्यातील मौजे.मुरुंबा येथे आत्मा अंतर्गत शेती दिन मोठ्या उत्साहात साजरा.....!


🌟कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंडळ कृषी अधिकारी दैठणा,कैलास गायकवाड यांची🌟


परभणी : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रवी हरणे ,प्रकल्प संचालक आत्मा दौलत चव्हाण,उपप्रकल्प संचालक आत्मा,प्रभाकर बनसावडे, तालुका कृषी अधिकारी,नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, परभणी यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान या विषयाची महिलांची शेती शाळेचा शेती दिन मुरुंबा येथे साजरा केला, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंडळ कृषी अधिकारी दैठणा,कैलास गायकवाड कृषी सहाय्यक प्रशांत ढोके, गावच्या सरपंच कांताबाई खंदारे तसेच शेती दिनाचे मार्गदर्शक प्रगतशील महिला शेतकरी मुक्ता झाडे ह्या होत्या,कैलास गायकवाड यांनी कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनेविषयी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली तसेच महिला शेतकऱ्यांनी छोटे छोटे गृह उद्योग उभारण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत लाभ घेण्याचे आवाहन केले,तसेच मुक्ता झाडे यांनी शेती शाळेमध्ये झालेल्या पहिल्या वर्गापासून म्हणजे जमिनीची मशागत, माती परीक्षण, बीज प्रक्रिया ,कीड रोग नियंत्रण काढणी व साठवणूक या सर्व वर्गाचे सविस्तर विश्लेषण केले,तसेच ही आत्मा अंतर्गत झालेली शेती शाळा शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर आहे ते सांगितले, या शेती शाळेमधील सोयाबीनची पेरणी बीबीएफ यंत्राद्वारे तसेच टोकन यंत्राद्वारे करण्यात आली होती,बीबीएफ यंत्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, येथील कुलगुरू डॉ.इंद्रमणी तसेच डॉ.स्मिता सोळुंके यांच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी परभणी, नित्यानंद काळे यांनी मोफत उपलब्ध करून दिले, तसेच डॉ.देशमुख, वाघमारे पशु शक्तीचा योग्य वापर विभागातील अधिकारी यांनी शेतकऱ्यांना बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करण्यासाठी वेळोवेळी खूप मोलाचे मार्गदर्शन केले,बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी केल्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा झाला आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरपूर प्रमाणात वाढ झाली बीबीएफ यंत्र नक्कीच फायदेशीर आहे अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या तसेच या महिला शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला कैलास गायकवाड यांच्या समक्ष पीक कापणी प्रयोग करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती घोडके यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन प्रशांत ढोके यांनी केले,कार्यक्रम यशस्वीरितेसाठी मनकरना झाडे, गोकर्ण झाडे,अनुसया, वर्षा तसेच प्रगतशील शेतकरी अंगद झाडे यांनी मोलाची मदत केली, अशाप्रकारे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या