🌟प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून जिल्ह्यातील ;10 ग्रामपंचायतींत केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन🌟
🌟विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची टाकळी कुंभकर्ण येथे उपस्थिती🌟
परभणी : ग्रामीण भागातील नागरिकांचे कौशल्य विकसित करून स्थानिक पातळीवरील रोजगाराच्या संधीसाठी ते पात्र ठरावेत, यासाठी जिल्ह्यातील 10 ग्रामपंचायतीमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण उद्योजकता कौशल्य विकास केंद्रांचे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्धाटन झाले. कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र यानुसार राज्यातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा आजच्या कार्यक्रमामध्ये समावेश आहे.
परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे पार पडलेल्या ऑनलाईन कार्यक्रमाला विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, विभागीय उपायुक्त जगदीश मिनीयार, शिवाजी शिंदे, उप विभागीय अधिकारी जिवराज डापकर, दत्तु शेवाळे, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, तहसीलदार संदीप राजपुरे, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक प्रशांत खंदारे, गटविकास अधिकारी श्रीमती दीपा बापट, नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर, सरपंच श्रीमती सुशिलाबाई बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
परभणी तालुक्यातील पोखर्णी व टाकळी कुंभकर्ण, गंगाखेडमधील राणीसावरगाव, जिंतूर तालुक्यातील बोरी मानवतमधील ताडबोरगाव, पाथरीतील लिंबा, पालम तालुक्यातील पेठशिवणी, पुर्णेतील ताडकळस, सेलू तालुक्यातील वालूर आणि सोनपेठमधील खडका येथे ही केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांच्या उद्घाटन कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, प्रगतशील शेतकरी, व्यापारी तसेच महिला, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी –विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतर कमी व्हावे तसेच ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना स्थानिक पातळीवर रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा. त्याद्वारे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारून बेरोजगारांचे जीवनमान सुधारावे, या दृष्टिकोनातून मागणीप्रमाणे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य शासनाद्वारे राज्यात एकूण 511 ग्रामपंचायतीमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण उद्योजकता कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत.....
0 टिप्पण्या