🌟गंगाखेड येथे ऊसतोड कामगारांसाठी विचारमंथन महामेळावा संपन्न.....!


🌟उसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह उभारण्यासाठी प्रयत्नशील - आ.डॉ.रत्नाकर गुट्टे 


गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी ऊसतोड कामगार महामेळाव्यास उपस्थित राहून बहुमोल असे मार्गदर्शन केले. तसेच मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी उपस्थित मंत्री महोदय यांच्याकडे काही लोकोपयोगी मागण्या केल्या. ऊसतोड करून वर्षानुवर्षे उदरनिर्वाह करीत असलेल्या ऊसतोड कामगारांच्या न्याय, हक्कांसाठी काही प्रमुख मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी गंगाखेड जवळील मौजे.गोदावरी तांडा येथे या भव्य-दिव्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


 
सध्या राज्यात जवळपास २३२ साखर कारखाने आणि जवळपास १५ लाख ऊसतोड कामगार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने असणारा ऊसतोड कामगार हा घटक वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे आपल्या व्यथा आणि वेदना सरकाराच्या कानावर घालण्यासाठी आपण आयोजित केलेला हा महामेळावा माझ्या दृष्टीने फारचं सकारात्मक ठरला. हा केवळ गौर बंजारा समाजाचा प्रश्न नाही. तर हातात कोयता घेवून ऊसाच्या फडात उभे राहाणाऱ्या माझ्या प्रत्येक ऊसतोड बांधवाच्या न्याय, हक्काचे विचारमंथन आहे, असे मत कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी मांडले. 


उसतोड कामगारांची फॅक्टरी कायद्यानुसार कामगार म्हणून आयुक्त कार्यालयात नावनोंदणी करून कामगार ओळखपत्र मिळाले पाहिजे. उसतोड कामगारांना जीवन व आरोग्य विमा मिळावा. अपघातग्रस्त उसतोड कामगारांना एक महिन्याच्या आत शासकीय नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. उसतोड कामगार मुकादम आणि वाहतूक यांच्या दरात वाढ व्हावी. कामगार मुकादम व वाहन मालक यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी समन्वय कायदा निर्माण करावा. उसतोड कामगारांना कामाच्या ठिकाणी रेशन अर्थात शिधा उपलब्ध व्हावा. उसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह उभारण्यात यावेत. कै.गोपीनाथ मुंडे उसतोड महामंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी, या तुमच्या प्रमुख मागण्या अतिशय रास्त आहेत. त्यामुळे सरकारने सकारात्मक विचार करून ठोस पावले उचलावीत. काबाडकष्ट करून जीवन जगणाऱ्या माझ्या गौर बंजारा समाजाच्या सुख-दु:खात मी कायम सोबत आहे, असेही विकासरत्न आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी पुढे बोलताना म्हटले 

यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील साहेब, मृद व जलसंपदा मंत्री संजयजी राठोड साहेब, विलास रामावत, गौर सेना अध्यक्ष अरुण चव्हाण, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, ॲड.संदीप आळनुरे, माधवराव गायकवाड, प्रभारी हनुमंत मुंडे, बालासाहेब रोकडे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, बाबुराव राठोड, संदीप राठोड, आंबादास राठोड, सुनिल राठोड, प्रमिलाकांत राठोड,अनिल राठोड, सखाराम जाधव, लखन राठोड सरपंच अशोक राठोड यांच्यासह गौर बंजारा समाज बांधव, ऊसतोड कामगार महिला, पुरूष, युवक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या