🌟मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती : तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा....!


🌟गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी निवेदनाद्वारे केली मागणी🌟 

आपल्या गंगाखेड मतदारसंघासह संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.‌ निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेती व शेतकरी यांना बसत आहे. यंदाच्या खरीप हंगामात म्हणजे २०२३ मध्ये सुरूवाती पासूनच पाऊस रूसला आहे. त्यामुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात तर सलग २२ दिवस पावसाचा खंड पडला होता. आताही मागील २५ दिवसांपासून पाऊस झालेला नाही. परिणामी, पिके करपून गेली आहेत. तसेच माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून चाऱ्याचाही प्रश्न सतावतो आहे. अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. 

त्यामुळे माझ्या मतदारसंघ कार्यक्षेत्रातील गंगाखेड, पालम व पुर्णा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करणारे निवेदन मी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांच्याकडे दिले आहे यावेळी मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासपा जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, उपसभापती संभाजीराव पोले, माजी सभापती शिवाजीराव निरदुडे, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, शिवाजीराव मुंडे उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या