🌟गायत्री गोविंद बुचाले या विद्यार्थिनीची विभागीय स्तरावर निवड🌟
परभणी/पुर्णा : परभणीत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रनिंग स्पर्धेमध्ये पुर्णा तालुक्यातील सुहागण येथील आदर्श शिक्षण संस्था छत्रपती संभाजी राजे विद्यालयातील विद्यार्थिनी कु.गायत्री गोविंद बुचाले या विद्यार्थिनींनी 200 मीटर रनिंग स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून दुसरा क्रमांक प्राप्त केला असून कु.गायत्री बुचाले हिची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय भोसले सर सचिव दिलीप माने सर व उपाध्यक्ष बळीरामजी भोसले तसेच मुख्याध्यापक मनोहर कल्याणकर यांनी अभिनंदन केले.या विद्यार्थिनीला शाळेचे क्रीडा शिक्षक भागवत सर व दहिफळे सर यांचे तिला मार्गदर्शन लाभलेऔरंगाबाद या ठिकाणी होणाऱ्या विभागीय रनिंग स्पर्धेसाठी तिला शाळेच्या सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या....
0 टिप्पण्या