🌟परभणी जिल्ह्यातील मानवत येथे जुगार खेळणाऱ्या दहा जणांवर पोलिसांनी केली कारवाई.....!

 


🌟मानवत शहरातील तापडिया लॉज मधील घटना🌟

मानवत : तापडिया लॉजवर तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या दहा जनांसह लॉज मॅनेजर वर मानवत पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई १८ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ०४-३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. 

            तापडिया लॉजच्या रूम नंबर ९ मध्ये तिरट नावाचा जुगार चालू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. प्रत्यक्ष जागेवर गेले असता तिचे दहा जण जुगार खेळत असलेले आढळले. त्यांच्याकडे जुगाराचे साहित्य, मोबाईल व नगदी असा ३८४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये कारवाई करून त्यांना नोटिसवर सोडण्यात आले. यात लॉजचे मॅनेजर चा सहभाग आहे. या कारवाईत सपोनी बनसोडे,ग्रेड पोउपनि पतंगे, पोहे.पंचांगे, पोहे. शेख, पोना. खूपसे, पोशी, बावरी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या