🌟परभणी जिल्ह्यातील नृसिंह पोखर्णीत मराठा आरक्षणासाठी विहीरीत उडी घेऊन एकाने केली आत्महत्या....!


🌟या घटनेमुळे बराच वेळ गावात तणावाचे वातावरण🌟 

परभणी (दि.३० ऑक्टोंबर) :  परभणी तालुक्यातील नृसिंह पोखर्णी येथील ४० वर्षीय नागोराव रंगनाथराव बुचाले यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची हृदयविदारक घटना घडली.

दरम्यान संतप्त मराठा समाज बांधवांनी मयत नागोराव बुचाले यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्याकरीता मज्जाव केला या आंदोलनकर्त्याच्या कुटूंबियांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, बुचाले कुटुंबाला आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यामुळे दोन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके,पोलिस उपनिरीक्षक संजय वळसे, बळीराम मुंढे,तहसीलदार डॉ.संदीप राजपूरे यांनी समाज बांधवांनी समजूत काढली. त्यानंतर तो मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या