🌟जंग-ए-अजित न्यूज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟केरळमधील हदीप नावाच्या 18 वर्षाच्या मुलाने मारुती 800 चे रूपांतर सर्वात महागड्या रोल्स रॉयस कारमध्ये केले आहे🌟


*महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेचे किती तीनतेरा वाजले हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यानंतर आता नांदेड जिल्ह्यात 24 बालकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे अवघ्या 24 तासात 24 बालके दगावले असून मृतांमध्ये 12 नवजात बालके आहेत.

* कोरोनाची लस तयार करण्यात मदत करणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. कॅटलिन कारिको (Katalin Kariko) आणि ड्रिव वेईसमन (Drew Weissman) यांना हा पुरस्कार जाहीर झालाय.

*भारतीय व्हिस्की 'इंद्री' ठरली जगात भारी ! जिंकला मानाचा पुरस्कार* *जागतिक व्हिस्की- टेस्ट स्पर्धेत अव्वल १०० व्हिस्कीची डबल गोस्ड बेस्ट इन शो पुरस्कारासाठी निवड केली जाते. यामध्ये भारतीय व्हिस्की 'इंद्री दिवाली कलेक्टर एडिशन २०२३' ने डबल गोल्ड बेस्ट इन शो पुरस्कार जिंकण्याचा मान मिळवलाय.

*दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमने शहानवाज उर्फ शैफी उज्जमा दहशतवाद्याला अटक केली आहे.NIA ने शहानवाज वर 3 लाखांचं बक्षीस ठेवलं होतं. दहशतवादी करवायात त्याचा हात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

*केरळमधील हदीप नावाच्या 18 वर्षाच्या मुलाने मारुती 800चे रूपांतर सर्वात महागड्या रोल्स रॉयस कारमध्ये केले आहे.

*अफगानिस्तानचा मोठा निर्णय ; समर्थन मिळत नसल्याने भारतातील दुतावास कार्यालय बंद केल्याची घोषणा

 *अफगानिस्तानने आज म्हणजेच १ ऑक्टोबर २०२३ पासून भारतातील दुतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

*ऑक्टोबरची सुरुवात महागाईने,कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 209 रुपयांची मोठी वाढ

*विधीमंडळ आयोग दोन दिवसांत निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करणार, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी माहिती घेणार

*दसऱ्यापूर्वी हक्काचे 400 रूपये प्रतिटन न दिल्यास दिवाळी गोड होणार नाही, 'स्वाभिमानी'चा साखर कारखानदारांना ढोल वाजवत इशारा*

 *राष्ट्रपिता महात्मा गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले नमन

 *राज्यात भाजप इज ऑल्वेज बॉस  -- देवेंद्र फडणवीस

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या