🌟दयावान सरकारच्या वतीने गरजू रुग्णांस रक्त उपलब्ध करून देऊन मदत...!

 


🌟रुग्णाचे नातेवाईक सचिन कांबळे सिंगनापुर यांनी दयावान सरकार व रुग्णसेवक रवी साबळे यांचे मानले आभार🌟 

परभणी : परभणी शहरातील परभणी आय.सी.यू. येथे उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णांस रक्ताची अत्यंत आवश्यकता होती तेव्हा रुग्णसेवक रवी साबळे यांनी आज दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी दयावान सरकार जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे यांना संपर्क साधून गरजू रुग्णासाठी रक्त उपलब्ध करून देण्यासाठी मदत मागितली असता तेव्हा दयावान सरकार संस्थापक अध्यक्ष संदीप भाई निकुंभ, मराठवाडा अध्यक्ष संजय भाई गायकवाड, जिल्हाध्यक्ष रघुवीर सिंग टाक, ॲड. सुभाष अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दयावान सरकार परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख इसाक व समाजहित अभियान प्रतिष्ठानचे राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर यांना सोबत घेऊन तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून मेट्रो ब्लड बँक येथून रुग्णांस रक्त उपलब्ध करून देऊन मदत केली आहे. रक्त उपलब्ध करून दिल्या बद्दल रुग्णाचे नातेवाईक सचिन कांबळे ( सिंगनापुर ) यांनी दयावान सरकार व रुग्णसेवक रवी साबळे यांचे आभार मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या