🌟दिव्यांग सुशिक्षित बेरोजगारांना ‘महास्वयंम’वर नोंदणी करण्याचे आवाहन....!


🌟जिल्ह्यातील दिव्यांग सुशिक्षित बेरोजगारांची ‘महास्वयंम’या शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन विभागाने केले🌟 

परभणी (दि.२६ ऑक्टोबर): दिव्यांग बांधवांना शासकीय नोकरीची संधी मिळणे, शासनाच्या विविध योजनांचा फायदा मिळविण्यासाठी बेरोजगारीचे प्रमाणपत्र (एप्लॉयमेंट कार्ड) काढणे गरजेचे ठरते. यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ या अभियानापूर्वी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योरजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यातील दिव्यांग सुशिक्षित बेरोजगारांची ‘महास्वयंम’या शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करून घेण्याचे आवाहन विभागाने केले आहे. 

शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी तसेच आवश्यक प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी दिव्यांगांना बराच त्रास सहन करावा लागतो. त्याअनुषंगाने विविध प्रवर्गातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर परभणी येथे बुधवारी (दि. ०१) ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये बेरोजगारीचे प्रमाणपत्र तयार करून देण्यात येणार आहे. खाजगी क्षेत्रात उपलब्ध नोकरीची संधी, रोजगार मेळावा, कौशल्य विकास प्रशिक्षण इत्यादीसाठी या प्रमाणपत्राचा फायदा होणार आहे.

तरी जिल्ह्यातील दिव्यांग सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील नोकरी साधक नोंदणी पर्यायाद्वारे हे प्रमाणपत्र काढून घ्यावे. प्रमाणपत्र काढण्यास अडचण येत असल्यास 9860015383, 9623020934, 9881524643, 9890828797 या भ्रमणध्वनीवर आधार कार्ड, पत्ता, मो.क्र., शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र व्हाट्सअप करावीत. त्यांच्या भ्रमणध्वनीवर प्रमाणपत्र पाठविण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांग उमेदवारांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन विभागाने केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या