🌟कर्नाटकातील गुलबर्गा येथील महाबुद्धविहारात भव्य बुद्ध रूपमूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न.....!


🌟अत्यंत धम्ममय वातावरणात हज़ारोंच्या उपस्थितीत बुद्ध रूपमूर्ती प्रतिष्ठापना🌟


 
 कर्नाटकातील गुलबर्गा शहराजवळ दक्षिण भारतातील अत्यंत आकर्षक आणि भव्य महाबुद्धविहारात काल शनिवार दि.२८ ऑक्टोंबर २०२३ रोजी इंडोनेशिया देशातून आणलेल्या भव्य बुद्ध रूपमूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा अत्यंत धम्ममय वातावरणात व देश-विदेशातील भिक्खू भदंत.डॉ.उपगुप्त महाथेरो (पुर्णा)वभिक्खू संघ श्रद्धावान उपासक-उपासिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकसभेतील विरोधीपक्ष नेते आदरणीय खासदार मलिकार्जुन जी खरगे साहेबांच्या यांच्या धम्म निष्ठेतून साकारलेले हे बौद्धमहाविहार पूर्णपणे इटालियन पांढर्‍या संगमरवरा पासून बनवले असून 18 एकराचा परिसर आहे.


निमंत्रित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध पूजा व प्रतिष्ठापना विधि संपन्न झाला. गगन मलिक फाउंडेशनचे सर्वेसर्वा आमचे धम्मबंधू गगन मलिक यांच्या 84 हजार बुद्ध रूप मूर्ती वितरण संकल्पना मधून आलेली ही मूर्ती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या