🌟पुर्णा तालुक्यांतील आव्हई येथे नवरात्री उत्सव निमीत्त तुकाई माता यांच्या भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम उत्सवात साजरा.....!


🌟तुकाई माता मंदिर देवस्थान संपूर्ण तालुका परिसरातील व आसपासच्या खेड्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे🌟


पुर्णा : पुर्णा तालुक्यांतील आव्हई येथिल जागृत देवस्थान असलेल्या तुकाई माता मंदिर हे ऐक गावच वैभव मानल जात, या तुकाई माता मंदिरात नवरात्र महोत्सव हे खूप मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो तुकाई माताच्या दर्शनासाठी  केवळ आव्हई येवढे गाव नाही तर संपूर्ण तालुका परिसरातील व आसपासच्या खेड्यातील हे देवस्थान प्रसिद्ध आहे.


त्यामुळे पंचक्रोशीतील भक्त येथे दर्शनासाठी तर आपले दुःख घेउन येतात या देवीचे मंदीर नवरात्रात भक्तांनी भरगच्च भरलेले असते तर जागृत व भक्तांच्या नवसाला पावणारे देवस्थान असल्यामुळे या मंदिरात नवरात्रात भक्तगण श्रद्धेने येत असतात या तुकाई माता देवीपाशी भक्तांच्या जिवनाचे कोडे उलगडले जातात दुःखात अश्रू नयनांनी तुकाई मातेला शरन आलेले भक्त मात्र जातांना आपआपल्या दुःखाचं निराकरण झाल्याने प्रसन्न मनाने हसत जातात असेही मानले जाते 

या गावांतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहून तुकामाईचे कार्यक्रम उत्सवात साजरा करतात व भव्य पालखी मिरवणूक काढली जाते नवरात्राच्या शेवटी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी पंचक्रोशीतील हजारो भक्त दर्शनासाठी येतात तर त्यांना गावकरी मंडळी तर्फे भोजन अर्थात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते सर्व गावकरी मंडळी हे पूर्ण दिवस अन्नदान करत असतात....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या