🌟परभणीत शिक्षण विरोधी धोरणांचा तीसर्‍या दिवशीही जोरदार निषेध.....!


🌟संयुक्त विद्यमाने धरणे आंदोलन : आजपासून काळ्या फिती लावून काम🌟

🌟मुख्याध्यापक संघ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना,जिल्हा संवर्धन मंडळ व जिल्हा क्रिडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलन🌟

 परभणी : कंत्राटी पध्दतीने शिक्षक व कर्मचारी भरतीसह कमी पटसंख्या असणार्‍या शाळांचे समूह शाळेत रुपांतर तसेच शाळा दत्तक योजनेचा शिक्षण विरोधी निर्णयाचा बुधवारी (दि.04) परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  शिक्षण संस्थाचालक महामंडळ, मुख्याध्यापक संघ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना, जिल्हा संवर्धन मंडळ व जिल्हा क्रिडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तीसर्‍या दिवशीही जोरदार धरणे आंदोलन करीत निषेध नोंदविण्यात आला.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने मुख्याध्यापक संघ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, जिल्हा संवर्धन मंडळ, जिल्हा क्रिडा शिक्षक संघटना यांच्या भक्कम सहकार्याने संपूर्ण जिल्ह्यात दि.०२ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिनापासून तीन दिवशीय धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली काल बुधवार दि.०४ ऑक्टोबर २०२३ रोजी तीसर्‍या दिवशीही या आंदोलनात  मोठ्या संख्येने विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. कंत्राटी शिक्षक भरतीचा आदेश रद्द करा, समूह शाळांचा आदेश रद्द करा, शाळा दत्तक योजनेचा आदेश रद्द करा, अशा जोरदार घोषणा देवून आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

              यावेळी जिल्हा शिक्षण संस्था महामंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष धारासूरकर, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक नावंदर, माजी नगरसेवक विजय जामकर, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत हाके, जिल्हा कार्याध्यक्ष उदय देशमुख, अजयराव गव्हाणे, गणपतराव भिसे,  शारिरिक शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष रणजित काकडे, महानगराध्यक्ष सुशील देशमुख, मराठवाडा शिक्षक संघाचे नेते यशवंत मकरंद, कबड्डी असोसिएशनचे राज्य कोषाध्यक्ष मंगल पांडे, पालक महासभेचे महेश पाटील, प्राचार्य नितीन लोहट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिक्षक संघटनेचे नेते मा.मा. सुर्वे, केशवअण्णा दुधाटे, रमाकांतअण्णा कुलकर्णी, प्राचार्य अनंत पांडे, बाळकृष्ण कापरे, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक आनंदी देशमुख, पी.आर. जाधव, प्रकाश हारगावकर, सुनील रामपुरकर, विवेक दिवाळकर, सूर्यकांत पाटील, अनिल तोष्णीवाल, संतोष गायकवाड, कैलास माने, उत्तमराव केंद्रे, अभिजित जोशी धानोरकर, भारत कांदे, मनिष देशमुख, अविनाश मालसमिंदर, शिवाजी वाघमारे, उत्तमराव शिंदे, बोराडे, माधव शिंदे, सुभाष ढगे, आर.के. चव्हाण, माऊली साळवे, उत्तम गोरे, अशोक उबाळे, सिध्दार्थ भिसे, तथागत झोडपे, संविधान भिसे, शिवाजी कांबळे, देवकते,निशांत हाके आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या