🌟जिंतूर शहरात पुन्हा प्रतिबंधित गुटख्याचा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त....!


🌟पो.नि.अनिरुध्द काकडे यांच्यासह पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने केली कारवाई🌟 

परभणी (दि.२९ ऑक्टोंबर) : बोलेरो पिकअप महिंद्रा या चारचाकी वाहनातून (एमएच ३७ टी ०३५७) बेकायदेशीररीत्या गोवा नामक गुटख्याची वाहतूक करणार्‍या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेवून १२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

          जिंतूर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अनिरुध्द काकडे यांच्यासह पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने रविवारी पहाटे ०२ वाजेच्या सुमारास एका चारचाकी वाहनास ताब्यात घेतले. त्यातून शासनाने बंदी घातलेला गोवा गुटख व तत्सम पदार्थ हे मानवी आरोग्यास घात असलेला साठा जप्त केला. पोलिसांनी नवनाथ शहाजी डोंबे, शेख मुक्ता शेख सत्तार या दोघांना ताब्यात घेतले. हे दोघेही जिंतूर शहरातील बलसा रस्त्यावरील नागरीक आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या