🌟जिंतूर तालुक्यातील मुरूमखेडा येथील देवानंद वाकळे यांना राज्यस्तरीय निर्भीड पत्रकारीता पुरस्कार जाहीर....!


🌟गरजुवंत,रुग्णांच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असतात,त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे🌟

परभणी - सामाजिक, धार्मिक आणि पत्रकारीता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल पत्रकार देवानंद शंकरराव वाकळे यांची राज्यस्तरीय निर्भीड पत्रकारीता पुरस्कार २०२३साठी निवड झाली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

     कुपवाड जि.सांगली येथील दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, शारदा वृद्ध सेवाश्रम तर्फे संस्थापक अध्यक्ष,हिंदरत्न दिपक लोंढे यांनी,मुरूमखेडा ता.जिंतुर जि.परभणी येथील आदर्श पत्रकार, देवानंद शंकराव वाकळे यांची ' दिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय निर्भीड पत्रकारीता पुरस्कार २०२३ ' साठी निवड झाल्याबद्दलचे पत्र दि.३० सप्टेंबर 2023 रोजी पाठवले आहे.

  वरील संस्थेच्या वतीने ' दिपगंगा भागीरथी राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२३ ' आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये समाजातील विविध क्षेत्रांमध्ये, दखल घेण्यासारखी, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे, यामध्ये आदर्श पत्रकार म्हणून देवानंद वाकळे यांना पुरस्काराने सन्मानित करून गौरविण्यात येणार आहे.

 आशिया खंडातील एकमेव नैसर्गिक मातीचे धरण असलेले , 'पूर्णा प्रकल्प ' मुरूमखेडा ता. जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असलेले पत्रकार ,देवानंद शंकरराव वाकळे माजी विशेष कार्यकारी अधिकारी तथा संपादक वैभव ज्वाला गेली तीन दशकांपासून पत्रकारितेसोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना शैक्षणिक,आरोग्य ,सांस्कृतिक ,क्रीडा ,स्काऊट गाईड ,गाव ,तांडावस्ती ,शहरी,ग्रामीण भाग, डोंगरदऱ्यामध्ये पायाची भिंगरी करून,पाऊस पाणी ,  वादळ वारा याची तमा न बाळगता गोरगरीब, महिला , दुर्बल घटक, युवक, युवती वर अन्याय झाला की , त्यांच्या वरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे देवानंद शंकरराव वाकळे हे आहेत,त्यांचे कार्य परभणी, हिंगोली, वाशिम,नांदेड , जालना, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) बीड लातूर जिल्ह्यामध्ये आहे.गरजुवंत, रुग्णांच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असतात,त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे,

महाराष्ट्र राज्यातील अत्यंत मानाचा उत्कृष्ट आदर्श पत्रकार पुरस्कार देवानंद शंकरराव वाकळे यांना जाहीर झाल्या बद्दल त्यांचे मित्र परिवार व चाहत्यांतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या