🌟पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळीतील ज्येष्ठ समाज सेवक माणिकराव रौंदळे यांच्या निधनामुळे गावात पसरली शोककळा....!


🌟त्यांच्या पश्चात एक मुलगा माजी ग्रामपंचायत सदस्य वामनराव रौंदळे व तिन मुली नातवंड असा मोठा परिवार आहे🌟

पुर्णा : पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील जेष्ठ समाजसेवक तथा माजी पंचायत समिती सदस्य गोदावरी शिक्षण संस्था संचलित राष्ट्र माता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल चे जेस्ट संचालक माणिकराव रौंदळे यांचे वयाच्या १०० व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असुन त्यांनी शुक्रवार दि.२७ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ०४-०० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला धनगर टाकळी गावामध्ये व पंचक्रोशी मध्ये त्यांचे सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्य सर्वश्रुत होते.शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान अनुयायी म्हणून ज्येष्ठ नेते माजी खासदार अण्णासाहेब गव्हाणे यांच्या सोबत कार्य केले गावा मध्ये गोरगरीब सर्व सामान्य बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा गावा मध्ये उपलब्ध व्हावी या साठी त्यांनी गोदावरी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळ सोबत समर्पित भावनेने कार्य केले.

पंचायत समिती सदस्य असताना शासनाच्या कल्याणकारी योजना गोर  गरीब जनते पर्यंत पोहचवण्याचा काम त्यांनी केले.राजकारणातील व समाज कारणातील धाड सी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती शोषित पीडित वंचित गरीब घट का तील जनते बाबत ते कमालीचे संवेदन शिल होते राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल धनगर टाकळी येथील कर्मचाऱ्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केले.त्यांच्या पश्चात सुपुत्र माजी ग्रामपंचायत सद्दस वामनराव रौंदळे  तीन सुकन्या नात वांडे फार मोठा परिवार आहे.

त्यांच्या दुःखद निधना बद्दल माजी आमदार विजय गव्हाणे भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सद्दस तथा गोदावरी व गंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  रामकिशन रौंदळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नारायणराव पिसाळ लोकपत्र चे उपसंपादक  डॉ गणेश जोशी गोदावरी शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ  साखरे  सखारामजी साखरे नरहरी साखरे रघुनाथ साखरे गंगाधर साखरे गुलाब खा पठाण दिनाजी गव्हाणे भगवान पाटील माजी पंचायत समिती सदस्य गोरखनाथ साखरे धनगर टाकळी चे माजी सरपंच शिवाजीराव साखरे विद्यमान सरपंच प्रा. सैनाजी माठे उपसरपंच शेख मगदूम साब माजी उपसरपंच शेरखा  पठाण माजी पोलीस पाटील गणपत साखरे पोलीस निरीक्षक चंद्रकांत साखरे दत्तराव शेरकर रोहिदास साखरे दत्तराव साखरे काशिनाथ साखरे डॉ.हरीभाऊ पाटील  पूर्णा शहर काँग्रेस उपाध्यक्ष शेख रफिक सर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर  माजी मुख्याध्यापक वामन राव पाटील मुख्याध्यापक डी.सी.डुकरे सर जेस्ट शिक्षक बी. एन.बेद्रे  एस.टी.महाजन संग्राम सोळंके एम.बी.शेख पठाण सर चंद्रकांत कुलकर्णी व इतरशिक्षक कर्मचारी आदींनी दुःख व्यक्त केले आहे दि.28 ऑक्टोबर 2023 दुपारी 12 वाजता अतिशय शोकाकुल वाता वरणत अंतिम संस्कार करण्यात आले.

या वेळी  समाजकल्याण सभापती मारोती बनसोडे कानखेड सरपंच मारोती ब खाल गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामकिशन रौंदळे त्याच प्रमाणे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर गावकरी आप्तेष्ट नातेवाईक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या