🌟परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अनुदान बँक खात्यावर जमा होणार....!


🌟हेक्टरी 8 हजार 500 रुपये : 3 लाख 90 हजार 758 शेतकर्‍यांना मिळणार लाभ🌟

परभणी (दि.10 ऑक्टोंबर) : परभणी जिल्ह्यात पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सन 2022 च्या पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकर्‍यांना विशेष बाब म्हणून आता 3 लाख 90 हजार 758 शेतकर्‍यांच्या थेट बँक खात्यावर हेक्टरी 8 हजार 500 रुपये या दराने 154 कोटी 48 लक्ष 7 हजार 680 रुपये रविवारपर्यंत (दि.15) जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत.

           जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी विशेष लक्ष घालून आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व पात्र बाधित शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आदेश दिले असून, या निधीची मागणी अ, ब, क, आणि ड अशा चार अहवालानुसार शासनाच्या महसूल व वन विभागा (मदत व पुनर्वसन)कडे करण्यात आली होती. सर्व तहसीलदारांनी शेतकरी आणि त्यांच्या नावापुढील रक्कमेची यादी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी व तसा अहवाल रविवार, (दि.15)पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या कामामध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

सततच्या पावसामुळे शेतपिकांच्या नुकसानीसाठी मदत निधीची यादी अ.क्र. तालुका एकूण बाधित शेतकरी एकूण बाधित क्षेत्रासाठी अहवालानुसार निधीची मागणी प्रती हेक्टरी 8,500 रुपये निधीची अहवालानुसार मागणी

1 परभणी 36,143 28,834 2450890002 सेलू 45,620 19,420 1650700003 जिंतूर 83,874 39,116 3324866804 पाथरी 28,151 12,653 1075505005 मानवत 38,323 16,924 1438540006 सोनपेठ 31,230 16,100 1368500007 गंगाखेड 51,419 14,900 1266500008 पालम 50,556 21,565 1833025009 पुर्णा 25,442 12,230 103955000एकूण 3,90,758 1,81,742 154,48,07,680

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या