🌟कंत्राटी कामगारांना शास्वत रोजगारांची हमी द्या......!


🌟तांत्रिक अॅप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनची मागणी🌟

नागपुर - विज क्षेत्रातील कत्राटी कामगाराचे ज्वलत प्रश्न अनेक वर्षापासुन प्रलंबित आहेत संघटनेने अनेक आदोलनाच्या माध्यमातुन प्रलंबित प्रश्नाला वाचा फोडली आहे. राज्याचे उर्जामंत्री व तिन्ही कंपनीच्या मुख्य प्रशासना समवेत कत्राटी कामगाराना कायम सेवेत सामावुन घेण्याकरीता शासन सकारात्क घोरण आखेल तसेच कत्राटी कामगाराना शास्वत रोजगारांची हमी देणार, सरळ सेवा भरती मध्ये प्राधान्य देणार व ईतर अशा स्वरूपाची घोषणा करण्यात आल्या होत्या त्यानुसार कार्यवाही करावी अशी मागणी तांत्रिक अॅप्रेंटीस कंत्राटी कामगार असोसिएशने राज्याचे उर्जामंत्री ना. देवेद्र फडणवीस याच्या कडे निवदेना व्दारे केली असल्याची माहीती राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिली आहे.

कंत्राटी कामगारांना ईतर राज्याप्रमाणे नियमित सेवेत कायम करण्यात यावे, कत्राटी कामगारांना रोजदारी पध्दतीने कामावर घेवुन शाश्वत रोजगारांची हमी दयावी, कत्राटी कामगारांना सरळ सेवा भरती मध्ये आरक्षण देण्यात यावे. तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगाराकरीता कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात यावी, महावितरण, महानिर्मीती, महापारेषण कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी करीता तिन्ही कंपनीमध्ये चुतुर्थ श्रेणीतील सरळ सेवा भरती मध्ये 100 टक्के आरक्षण देण्यात यावे. शासनाने सरळ सेवा भरती करीता वयोमर्यादेमध्ये वाढ केली आहे. परंतु महावितरण कंपनीमध्ये अद्याप या बाबत काहीच कार्यवाही केली नाही. सरळ सेवा भरती प्रकीयमध्ये वयोमर्यादा मध्ये वाढ करण्यात यावी, तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांनाकडुन कंत्राटदार गासिक वेतनामधुन रु 4000 ते 6000 ची मागणी केली जाते. पैसे परत न केल्यास त्याना कामावरून कमी केल्या जात आहे. नियमाप्रमाणे वेतन फक्त कागदोपत्रीच दाखविल्या जाते. प्रत्येक्षात मात्र कत्राटी कामगारांची आर्थीक पिळवणुक करण्यात येते. उदा अकोला / नादेड / वाशीम / सातारा / महानिर्मीती पोफळी / महानिर्मीती उजणी,कंत्राटदार बदल्यानतर कत्राटी कामगारांना परत कामावर घेण्यासाठी कंत्राटदाराकडुन पैसे ची मागणी, मानसिक छळ केला जातो. तसेच संपर्क पोर्टल मध्ये कंत्राटी कामगाराची माहीती अपलोड केलेली असते विनाकारण कंत्राटी कामगाराकडुन कागदपत्राची मागणी करण्यात येवु नये, पुर्वीप्रमाणे रिक्त कामगारांच्या संख्येच्या 95 टक्के कंत्राटी कामगार भरती करण्यात यावी, कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) च्या सुविधा प्रत्येक कत्राटी कामगारा पर्यंत पोहचविण्याकरीता कार्यवाही करावी आदी, महापारेषण कंपनीमध्ये वायरमन आयटीआय धारकांना सरळ सेवा भरती मध्ये संधी द्यावी. 

प्रलंबित प्रश्नामुळे कंत्राटी कामगारामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे दिलेल्या आश्वासनानुसार कंत्राटी कामगाराचे प्रश्न सोडविण्यात यावे अशी मागणी राज्याचे उर्जामंत्री ना. दवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली असल्याची माहीती तांत्रिक अॅप्रेंटीस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने,राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे, सरचिटणीस शेख राहील, अतुल पाटील, प्रताप खंदारे, प्रमोद भालेराव, गजानन अघम यांनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या