🌟‘दिव्यांगाच्या दारी’अभियान तात्पु रते पुढे ढकलले,नवीन तारिख लवकरच कळविणार - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟काही अपरिहार्य कारणास्तव सदर कार्यक्रम तात्पुरता पुढे ढकलण्यात आल्याचे जिल्हाधिकारी गावडे म्हणाले🌟 

परभणी (दि.३० ऑक्टोंबर) : जिल्ह्यातील दिव्यांगांच्या समस्या आणि तक्रारी सोडविण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान बुधवार दि.०१ नोव्हेंबर २०२३ रोजी शहरातील अन्नपुर्णा लॉन्स, जिंतूर रोड येथे आयोजित करण्यात आले होते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव सदर कार्यक्रम तात्पुरता पुढे ढकलण्यात आला असून,लवकरच जिल्हा प्रशासनाकडून नवीन तारिख कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळविले आहे.

‘शासन आपल्या दारी’ या राज्य शासनाच्या धर्तीवर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभाग एकाच छताखाली आणून दिव्यांगासाठी राज्य शासनाच्या विविध विभागाकडून योजना राबविल्या जातात. त्या योजनांचा लाभ दिव्यांगाना व्हावा, योजनांची प्रसिद्धी करुन सर्व योजना संबंधित लाभार्थ्यापर्यंत पोहोचाव्यात, एकही दिव्यांग या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख मार्गदर्शनात हे अभियान राबविले जात आहे. त्यामुळे अध्यक्षांच्या सूचनेनुसार अभियानाच्या आयोजनाची पुढील तारखेची माहिती लवकरच कळविण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळविले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या