🌟जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟कुठे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कुठे सत्तेसाठी लाचार ; एकनाश शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टिका🌟

 *तुमची खोक्याची लंका दहन करणारा धगधगती मशाल माझ्याकडे आहे; उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल*

* कुठे बाळासाहेबांचा विचार आणि कुठे सत्तेसाठी लाचार; एकनाश शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

* दसऱ्याच्या दिवशी निलेश राणे यांचा सक्रीय राजकारणाला जय महाराष्ट्र!*

* आता माझी माणसं संयम दाखवणार नाहीत, पंकजा मुंडे यांचा मोठा इशारा

* युवा संघर्ष यात्रा ही नव्या पिढीची दिंडी; शरद पवारांकडून रोहित पवारांना भरभरुन शुभेच्छा.

* भाजपला धक्का माजी प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांचा ठाकरे गटात प्रवेश

* 2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार S&P Global अहवालात दावा

* अभिनेत्री कंगनाने दिल्ली येथील इस्त्रायल दूतावास येथे राजदूत नाओर गिलोन यांची भेट घेतली. कंगनाने इस्लामिक दहशतवादाचा विरोध केला आहे.

* 'आता आरक्षणाशिवाय माघार नाही'; मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला सुरुवात

* पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आता भारतीयांना श्रीलंकेत मिळणार 'व्हिसा फ्री' प्रवेश

* गाझा युद्धात आता सौदीची 'एन्ट्री' इराणला रोखण्यासाठी इस्रायलच्या दिशेनं डागलेलं मिसाईल पाडलं

* पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाच्या जागी 'भारत' लिहा; NCERT समितीने केली शिफारस !

* मुंबई पोलिसांची मध्यरात्रीच पाण्याखाली शोधमोहिम;* ललित पाटीलने नदीत फेकलेले 100 कोटींचे ड्रग सापडले!

* कंगना रणौत ठरणार दिल्लीत 'लव कुश रामलीला'मध्ये रावण दहन* करणारी पहिली महिला अभिनेत्री

* रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड 11 लाख कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ 42 टक्यआवरउन 46 टक्के केला आहे 

* पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळणार! पुढील दोन दिवस पुणं गारठणार; ऑक्टोबर हिटपासून पुणेकरांना दिलासा

* कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! कांद्याच्या दरात वाढ, प्रति किलोसाठी 40 ते 45 रुपयांचा दर

* ग्लेन मॅक्सवेलने नेदरलँड्सविरुद्ध 40 चेंडूत शतक झळकावून वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा केला पराक्रम

* दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 22 हजार 300 कोटींचं गिफ्ट, रब्बी हंगामासाठीही खतांवर सबसिडी कायम राहणार, युरियाच्या किमतीत वाढ नाही, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय 

* नवरात्र उत्सवाच्या कालावधीत तुळजाभवानीच्या तिजोरीत पावणे चार कोटी; पाऊण किलो सोने, बारा किलो चांदीही देवीचरणी अर्पण

* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या  नगर जिल्ह्यातील  सभेतमराठा आरक्षणावर जाब विचारणार, शिवसेना ठाकरे गट – संभाजी ब्रिगेड यांची आक्रमक भूमिका 

* मुबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिका अॅक्शन मोडमध्ये, सूचना जारी, पालन न केल्यास कारवाईचाही इशारा 

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची शक्यता

* इंडिया नाही आता भारतच! सर्व पुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार, NCERT चा मोठा निर्णय

* मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत मंगळवारी संपली.* *आजपासून (२५ ऑक्टोबर) जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मनोज जरांगेंनी उपोषण सुरू करताच आज मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगेंशी फोनवरून संवाद साधला.

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या