🌟सज्जनाचा सहवास चंदन आणि चंद्रमा पेक्षाही शितल व आल्हाददायक असतो🌟
✍🏻व्यक्ती आणि व्यक्तीमत्व : श्रीकांत हिवाळे
पुर्णा येथील महाराजा यशवंतराव होळकर सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.भोजाजी बनसोडे यांचं समस्त जीवन आणि कार्य तरुणाई समोर प्रेरणादायी स्फूर्तीदायक व दिशादर्शक असे आहे.अस म्हटल्या जाते सज्जनाचा सहवास चंदन आणि चंद्रमा पेक्षाही शितल व आल्हाददायक असतो.चंदनाचा फक्त सुगंध येतो.
चंद्राचा प्रकाश आल्हाद दायक वाट तो.परंतु सज्जन माणसाच्या सहवासातुन संस्कारातून एक आदर्श व सु संस्कृत माणूस घडत असते.शालेय जीवनामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री आदरणीय महादेव जानकर यांचे भाषण त्यांच्या ऐकण्यात आले होते.त्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून महापुरुष समाज सुधारक यांच्या कार्याची त्यांनी केलेली मांडणी. होळकर घराण्याचा समाजसेवेचा त्यागमय इतिहास. आदर्श राज्य कर्त्या अहिल्यादेवी होळकर यांचं लोक कल्याणकारी राज्य.रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले राजर्शी शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशातील शोषित पीडित वंचित दलित बहुजन समाजाच्या उत्थानासाठी असलेले योगदान आदरणीय जानकर साहेबांच्या स्फूर्तीदायक भाषणामधून ऐकले. समाजाच्या उत्थानासाठी जानकर साहेब अविवाहित राहून जाणीव जागृती करण्याचे काम समर्पित पणे करत आहेत हे एडवोकेट भोजाजी बनसोडे यांना भावले.यशवंत ग्राम कावलगावचे सरपंच सत्यशोधक समाजसुधारकांच्या विचाराचे कृतीशील वारसदार दिवंगत मारोतराव जी पिसाळ यांनी आयोजित केलेल्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीला त्यांनी उपस्थिती लावली.
भोजाजी बनसोडे यांच्यामध्ये असलेली महापुरुष समाज सुधारकाविषयी असलेली जिज्ञासा पाहून त्यांनी महात्मा फुले समग्र वांग्मय हा ग्रंथ त्यांना भेट दिला.या बाबीचा दूरगामी परिणाम त्यांच्या जीवनावर झाला.घरातील वातावरणही या बाबीला पोषक असेच होते.वडील एकनाथ पांडुरंग बनसोडे कमालीचे सदाचारी सर्वांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणारे परोपकारी वृत्तीचे.आई मथुराबाई स्वभावाने अतिशय प्रेमळ कष्टाळू आलेल्या पाहुण्यांचं मनोभावे आदर तिथ्य करणाऱ्या उपाशी पोटी कुण्याही पाहुण्याला न जाऊ देनारा त्यांचा स्वभाव.आपला मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेऊन वकिलीचे शिक्षण घेतोय याबद्दल त्यांना सार्थ अभिमान होता.काका रंगराव भेलाजी बनसोडे उपसरपंच असताना गावातील लेकरांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून स्वतःची राहण्याची जागा शाळेला दान केली.इतकी त्यांना शिक्षणा विष् यी व शाळेविषयी आत्मीयता होती.
सर्व जाती धर्माचे मित्रमंडळी घरी यायचे.आई मथुरा बाई सर्वांचं आदर तिथ्य त करायच्या.त्यांना वाटायचं आपल्या मुलांन खूप शिकावं चांगली नोकरी करावी. भोजाजी बनसोडे यांनी एलएलबी केल्यानंतर स्वतःला विधायक कामामध्ये गुंतवून घेतले.समविचारी विविध जाती धर्मातील उच्चशिक्षित तरुणांना सोबत घेऊन 2008 या वर्षामध्ये भारतीय संविधान जागृती अभियान सुरू केले.संपूर्ण पूर्णा तालुका व परभणी जिल्ह्यामध्ये शाळा महाविद्यालयामध्ये भारतीय संविधानाविषयी मान्यवरांची व्याख्यान ठेवणे विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा चे आयोजन करणे.ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये सलग आठ वर्ष सातत्यपूर्ण संविधान जागृती चे कार्यक्रम त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडले.
या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य असे होते खेड्यामधील महादेव मंदिर असेल सार्वजनिक जेवढी असेल पार असेल अशा ठिकाणी हे कार्यक्रम घेतले जात.फार मोठा प्रतिसाद त्याला मिळत असे.सायंकाळच्या वेळी पार पडणाऱ्या या कार्यक्रमाला गावामधील सर्व जाती धर्माचे लोक माता भगिनी संविधान जागृतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहत.मला हे दोन-चार वेळा त्यांच्यासोबत उपस्थित राहण्याचा संविधानावर व्याख्यान देण्याचा योग आला.ग्रामीण भागातील अडाणी निरक्षर जनतेला भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनतेच्या सर्वांगीण कल्याना साठी समता स्वतंत्र न्याय बंधुभाव प्रस्तापित करण्यासाठी भारतीय संविधान लिहिलीय.भारतीयांचा सर्वोत्तम आचार ग्रंथ भारतीय संविधान आहे
हे संविधान जागृती अभियानातून सामान्य जनतेच्या गळी उतर वण्याच काम भोजाजी बनसोडे व त्यांचे सहकारी करत असत. या अभियानामध्ये त्यांच्यासोबत अगदी जीवाभावाचे सहकारी सर्व जाती धर्मातील युवक होते बालाजी धुत राज जगन्नाथ रेंनगडे ज्ञानोबा बनसोडे सुरेश मगरे पंडित भोसले विश्वनाथ मोरे बबन महाराज खंदारे आनंद वाईवल व्यंकटेश काळे प्रदीप राज भोज विठ्ठल साखरे मोहम्मद मुजफ्फर अब्दुल खाली सर आदींचा या अभियानात सक्रिय सहभाग होता.संविधान जागृती अभियाना बरोबर महापुरुष व समाज सुधारकांच्या जयंती व स्मृतिदिन सार्वजनिक स्वरूपात भ व्य प्रमाणात साजरे करण्या मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.पुस्तके ,ग्रंथ वाचण्याची त्यांना मनस्वी आवड.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थी सामाजिक कार्य करणारे समाज सेवक यांना मार्गदर्शन हितोपदेश वाचन्यात आला.
ऐक तरुण डॉ.बाबासाहेब यांच्या कडे येतो व त्यांना म्हणतो मला तुमच्या सारखी समाज सेवा करायची.तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्याला म्हणतात "तुझा व्यवसाय कोणता आहे. तु तुझी व कुटुंबाची उपजीविका कशी भाग वतो "तो म्हणतो माझा व्यवसाय कोणताही नाही.माझ्या कडे उपजीविकेचे कोणतेही साधन नाही.त्या वेळी त्याला डॉ.बाबासाहेब सांगतात प्रथम तु उपजीविकेचे साधन प्राप्त कर.तुला कोणताही उद्दोग नाही.तुझ्या सारख्या कडून खरी समाज सेवा होणार नाही.समाजाचं शोषण अशा निरुद्दोगी समाज सेव का कडून होण्याची दाट शक्यता असते.
ॲड.भोजाजी बनसोडे यांनी आपल्या सर्व मित्र मंडळी समविचारी सर्व जाती मधील समाज बांधवांना विस्वा सात घेऊन महाराजा यशवंतराव होळकरसहकारी पत संस्था पूर्णा २० मार्च २०१८ ला स्थापन केली.हे करत असताना खुप अडचणी अडथळे आल्या.परंतु दुर्दम इच्छाशक्ती व प्रचंड आशावादाच्या जोरावर त्यांनी पतसंस्था स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण केले.३००० हजार सभासद व प्रतेका कडून ६००रुपये सभासद फीस घेतली.पत संस्थेला कायदेशीर मान्यता आणली.हे अतिशय जोख मीच जबाब दारीच काम करत असताना गंगाधर सातपुते देविदास साखरे व्यंकटराव पिसाळ बबन सौदागर गिर माजी चांदणे आबासाहेब राऊत रतन साखरे एस. टी.महाजन एम.बी.शेख यांची मोलाची मदत व समर्थ साथ मिळाली.
सर्वाच्या सांघिक प्रयत्नां मधून पत संस्था उभी राहिली.आज रोजी पतसंस्थेकडे साडेतीन कोटीचे भाग भांडवल आहे.प्राधान्य क्रमाने समाजातील बेरोजगार सुशिक्षित तरुणांना व्यवसाय उभारणीसाठी कर्जाची सुविधा व त्याचबरोबर त्यांचे समुपदेशन केले जाते.पिगमी एजंट च्या माध्यमातून छोटे मोठे व्यवसा यिक यांना अल्प बचतीचे उद्दिष्ट त्यामधून होणारी बचत त्यांचा व्यवसाय वाढीस मदत होणारी असते.त्यामुळे मोठा प्रतिसाद मिळत असतो.पतसंस्था दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करत असते.दिनदर्शिका मध्ये समाजातील सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय त्यांच्यावरील प्रेरणादायी लेख प्रकाशित करून दिनदर्शिकेच्या माध्यमातून घराघरांमध्ये पोचविले जातात.पतसंस्थेमध्ये कमालीची पारदर्शकता आहे दरवर्षी पतसंस्थेचे ऑडिट होते.पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी समता पतसंस्था कोपरगाव महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनचे काकासाहेब कोयटे यांची कार्यालयात भेट घेऊन पतसंस्था कशी अद्यावत करता येईल या संदर्भामध्ये विचारविमर्ष केला.
बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे मुख्य कार्यालय बुलढाणा येथे जाऊन भेट घेतली तेथील कामकाजाची पाहणी केली.कर्मचाऱ्यांना पुणे या ठिकाणी सहकार भारती येथे प्रशिक्षणासाठी पाठवले.यामधून येथील कर्मचाऱ्यांचे ज्ञान अद्यावत झाले.पुर्णा तालुक्यामधील एक विश्वास पात्र सहकारी पतसंस्था म्हणून महाराजा यशवंतराव होळकर सहकारी पतसंस्था पूर्णा या कडे बघितले जाते.पत संस्थेचे संचालक व राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल धनगर टाकळी येथील जेस्ट शिक्षक एस.टी महाजन सर यांचे पतसंस्थेचे भाग भांडवल व डिपॉझिट वाढवण्यामध्ये मोठे योगदान आहे. एडवोकेट भोजाजी बनसोडे यांना समर्थ देण्याचे काम त्यांच्यां सुविद्य पत्नी आशाताई करत असतात.
संचालक मंडळामध्ये त्यांचाही समावेश आहे.अतिशय प्रतिकूल परिस्थिती मधून ॲड.भोजाजी बनसोडे यांनी पतसंस्था स्थापन करून समाजासमोर नवा आदर्श ठेवला.त्यांचा आदर्श आजच्या तरुणांनी घ्यावा ....!
त्यांच्या मानवता वादी कार्यास हार्दिक शुभेच्छा...!
शुभेच्छुक
श्रीकांत हिवाळे सर
अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ता. पूर्णा जी.परभणी.
.
.
0 टिप्पण्या