🌟पुर्णा येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या साक्षीने मराठा आरक्षणासठी सकल मराठा समाजाचा एल्गार.....!


🌟क्रांतीकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतीसाद : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या समोर साखळी उपोषणाला सुरुवात🌟


पुर्णा (दि.२६ ऑक्टोंबर) - येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या साक्षीने मराठा आरक्षणासठी सकल मराठा समाजाने एल्गार पुकारला असून सकल मराठा सामाजाच्या वतीने क्रांतीकारी मराठा योध्दा सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतीसाद देत आणी त्यांना भक्कम पाठिंबा म्हणून जो पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही तो पर्यंत समस्त पुर्णा तालुक्याच्या वतीने काल बुधवार दि २५ ऑक्टोंबर २०२३ पासून शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका समोर साखळी उपोषण सुरुवात केली आहे. 

पुर्णा शहरातील समाज बांधवांसह ग्रामीण भागातील देखील सकल मराठा समाज बांधव साखळी उपोषनात सहभाग नोंदवत आहेत सदर उपोषनास पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक प्रदीपजी काकडे शिवसेना (उबाठा) परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम तसेच पुर्णा तहसिलचे तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी आवर्जून भेट दिली आज गुरुवार दि.२६ ऑक्टोंबर रोजी उपोषनाचा दुसरा दिवस आसून आज लोखंडे पिंपळा येथील ग्रामस्थ साखळी उपोषणास बसले आहेत सदर साखळी उपोषनाकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास व मनोज जरांगे पाटिल यांच्या आदेशानुसार नंतरच्या काळात आमरण उपोशनास तयार आहोत सदर उपोषन व तालुक्यात जनजागृती करुन लढा तिव्र करुत आम्ही सर्व सकल मराठा समन्वयक साहेबराव कल्याणकर ज्ञानोबा कदम मुंजाभाउ,कदम शरद कदम विष्णु कदम प्रविन डाखोरे सुणील ईंगोले गोविंद नाना आवरगंड ईत्यादी ने पुढाकार घेतला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या