🌟परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत इंदेवाडीत सोयाबीन कापणी प्रयोग....!


🌟जिल्हाधिकारी गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव बाबुराव चंदेल यांच्या शेतात सोयाबीन पीक कापणीचा प्रयोग🌟


परभणी (दि.१५ ऑक्टोंबर) : दैठणा महसूल मंडळातर्गत इंदेवाडी येथे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव बाबुराव चंदेल यांच्या शेतात सोयाबीन पीक कापणीचा प्रयोग करण्यात आला. 

यंदा खरीप हंगामातील असमाधानकारक पावसामुळे उत्पादनात किती प्रमाणात घट येऊन शेतकऱ्याचे नुकसान आहे, या अनुषंगाने हा पीक कापणी प्रयोग घेण्यात आला तसेच जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी रवि हरणे, तहसीलदार संदीप राजापुरे, सांख्यिकी विभाग प्रमुख श्री. लोंढे, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे, मंडळ कृषी अधिकारी कैलास गायकवाड, आय.सी.आय.सी. पिक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी श्री. बेंद्रे व त्यांचे सहकारी तसेच गावचे सरपंच मोहनराव कच्छवे, उपसरपंच संदीप चंदेल यांच्यासोबत कृषी सहाय्यक व्हि.पी. हातोले, कृषी पर्यवेक्षक रोशन करेवार व इतर अधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या