🌟यावेळी बुद्ध विहार ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहापर्यंत भिख्खु संघाची रॅली काढण्यात आली🌟
पुर्णा : भारतीय बौद्ध महासभा माता रमाई महिला मंडळाच्या वतीने आज शुक्रवार दि.२७ ऑक्टोंबर २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे चालू असलेल्या वर्षावास गृंथ वाचणाचा समारोप संपन्न झाला.
या प्रसंगी आज भारतीय बौद्ध महासभा,माता रमाई महिला मंडळ,तथा समता सैनिक दल यांच्या वतीने भिखु संघ व सरमनेर भिखू यांना भोजन दान बौध्द विहार पुर्णा या ठिकाणी देण्यात आले. विहारापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहापर्यंत भीखु संघाची रॅली काढण्यात आली. व सभागृहात भारतीय बौद्ध महासभेचे परभणी जिल्हा अध्यक्ष दक्षिण श्यामरावजी जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली समारोपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात प्रामुख्याने भंते प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो तसेच भंते पय्यावंश नगर सेवक उत्तम भैय्या खंदारे, ॲड.धम्मा जोंधळे,ॲड.हर्षवर्धन गायकवाड, देवराव दादा खंदारे तसेच श्रामनेर भिख्खू संघ उपस्थित होते.भंते खेमधम्मो यांच्या धम्म देशनेने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे आजी माजी पदाधिकारी माता रमाई महिला मंडळ तसेच समता सैनिक दल या सर्वांनी अथक परिश्रम घेतले......
0 टिप्पण्या