🌟पाथरी तालुक्यातील वाघाळा जिल्हा परिषद शाळेतील मराठा विद्यार्थ्यांनी सत्र परिक्षेकडे फिरवली पाठ.....!


🌟मराठा आरक्षण व मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पाच जनांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस🌟


प्रतिनिधी

पाथरी :- तालुक्यातील वाघाळा येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या मराठा विद्यार्थ्यांनी शाळेत सुरू असलेल्या प्रथमसत्र परिक्षे कडे पाठ फिरवली असून आज चौथ्या पेपर ला एकही विद्यार्थी उपस्थित नसल्याची माहिती या शाळेचे मुख्याध्यापक यु जी स्वामी यांनी दिली.


मराठा समाजाला कुनबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणी साठी आंतरवली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील अमरण उपोषणा साठी बसले आहेत. त्यांच्या याच उपोषणाला पाठिंबा म्हणून पाथरी तालुक्यात पाच ठिकाणी साखळी उपोषणे सुरू आहेत. त्यात लिंबा जिल्हापरिषद सर्कल मधील साखळी उपोषण हे वाघाळा या गावात छत्रपती शिवराय यांच्या स्मारका जवळ २५ ऑक्टोबर पासुन सुरू आहे. या आंदोलनात वाघाळा येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील ३६ मुलं आणि ५६ मुली या आरक्षणच नाही तर शिकायचंच नाही असा निर्धार करत उपोषण स्थळी बसुन दर दिवशी घोषणाबाजी करत आहेत. जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत शाळेत जाणारच नाही असा निर्धार या शाळाकरी चिमुल्या विद्यार्थ्यांनी केला असून. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत प्रथमसत्र परिक्षांना मागिल चार दिवसा पासुन सुरूवात झाली असून या चार ही पेपरला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी अनुपस्थिती असल्याची माहीती मुख्याध्यापक यु जी स्वामी यांनी दिली. या शाळेत एकुन २८९ विद्यार्थी शिक्षण घेतात त्यात ९२ मुले हे मराठा समाजाचे आहेत हे सर्व विद्यार्थी या उपोषणात सहभागी झाले आहेत. आपले सहकारी बांधव परिक्षा देत नसल्याची खंत ही इतर समाजातील विद्यार्थी व्यक्त करत आहेत. वर्गातील रिकामे बेंच पहात मनात कुठे तरी मित्र परिक्षेला येत नसल्याची खंत या विद्यार्थ्यांच्या मनात ठेऊन पेपर देत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

वाघाळा येथे मागील सात दिवसा पासुन सुरू असलेल्या साखळी उपोषणाचे काल अमरण उपोषणात रुपांतर झाले असुन वाघाळा गावचे सरपंच बंटी पाटील,वसंत घुंबरे,सचिन वाघ,भागवत घुंबरे,सारोळा येथील तुकारामजी वाघ,फुलारवाडी चे सरपंच विष्णू नवले यांनी दोन दिवसा पासुन अमरण उपोषण सुरू केले असुन त्यात अनेक गावचे मराठा समाज बांधव या ठिकाणी उपोषण स्थळी येत आहेत. दर दिवशी रात्री नऊ वाजता हरिकिर्तन,व्याख्यान,भजन असे सांप्रदाईक कार्यक्रम संपन्न होत आहेत. वाघाळा सह बाभळगाव फाटा , हादगाव, कासापुरी फाटा, पोखर्णी फाटा या पाच ठिकाणी पाथरी तालुक्यातील संपुर्ण गावचे मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत. तर संपुर्ण गावां मध्ये राजकीय पुढा-यांना गावबंदी करण्यात आलेली आहे. मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्या प्रमाणे आंदोलनाची दिशा ही शांततामय मार्गाने सुरू आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या