🌟पुरस्कारसाठी निवडलेली पुस्तके व लोककलावंत यासाठी मंडळाचा अंतीम निर्णय राहील🌟
गडचिरोली: दि.९ ऑक्टोबर२०२३.
गडचिरोली जिल्हा झाडी बोली साहित्य मंडळाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुस्तकांसाठी ३ पुरस्कार तसेच लोककलावंतासाठी १ पुरस्कार असे एकूण चार पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. पुरस्काराचे स्वरूप १०००/-रू. रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे. यासाठी खालील अटीचे आधीन राहून झाडीपट्टीतील साहित्यिक व लोक कलावंताकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. अटी व शर्थी अशा- १) पुस्तके ही १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रकाशित झालेली असावीत. २) झाडी बोलीतील पुस्तकास विशेष प्राधान्य राहील. ३) साहित्यिकांनी पुस्तकाच्या दोन प्रती व लोककलावंताने केलेल्या कामाचे दाखले डॉ.चंद्रकांत लेनगुरे, साईनगर, चामोर्शीरोड, गडचिरोली या पत्यावर पाठविणे आवश्यक आहे. मो. न.९४२३६४६७४३. ४) पुरस्कारा साठी पुस्तके-प्रस्ताव दिनांक २४/९/२०२३पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. ५) साहित्यिक व लोककलावंत हा झाडीपट्टी भागातील रहिवासी असावा. ६) पुरस्कारसाठी निवडलेली पुस्तके व लोककलावंत यासाठी मंडळाचा अंतीम निर्णय राहील.
सदर पुरस्काराचे वितरण शाखेच्या वतीने गडचिरोलीत घेण्यात येणाऱ्या विदर्भस्तरीय खुल्या काव्यसंमेलनात करण्यात येणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे आवाहन गडचिरोली जिल्हा झाडी बोली साहित्य मंडळाच्या वतीने करण्यात आले असल्याचे आमच्या प्रेस कार्यालयास श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींनी कळविले आहे.....
0 टिप्पण्या